शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात चीन-पाकिस्तानचा संबंध नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 15:10 IST

सरकार सुधारणास तयार

ठळक मुद्देआठवले म्हणाले शेतकऱ्यांना ज्या सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परन्तु सुधारणा करण्यास तयार आहे

नागपूर : शेतकरी आंदोलनावर अनेक भाजप नेते टीका करीत आहेत, या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात चीन पाकिस्तान पोहोचू शकत नाही, असे एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे स्पष्ट केले.

आठवले म्हणाले शेतकऱ्यांना ज्या सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परन्तु सुधारणा करण्यास तयार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीही सरकारशी संवाद साधण्यास पुढे यावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. थंडीमध्ये शेतकरी आहेत हे आम्हालाही चांगलं वाटत नाही, सरकारची संवादाची भूमिका आहे, शेतकऱ्यांनीही दोन पाऊल पुढे यावे, आंदोलन चिघळवणे बरोबर नाही. आंदोलनात पाकिस्तान किंवा चीनचा काही संबंध नाही, असे आठवलेंनी स्पष्ट केले. परंतु, केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी आंदोलनात माओवादी शिरल्याचे म्हटले आहे, याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, असे असेल तर त्याची चौकशी व्हावी. पत्रपरिषदेत महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, केंद्रीयमंत्री रावासाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनास चीन आणि पाकिस्तानचं पाठबळ असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, राज्यात दानवेंविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यांचा निषेध नोंदवत पुतळेही जाळण्यात आले. 

प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावेआठवले यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकट्याच्या भरवश्यावर सत्ता येऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर