चिमुकल्यांना आईवडिलांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST2021-05-10T04:09:28+5:302021-05-10T04:09:28+5:30

नागपूर : अशासकीय संस्थांकडील दोन चिमुकल्यांना आपल्या आईवडिलांची प्रतीक्षा आहे. वैष्णवी नावाची २० दिवसांची बालिका गतवर्षी ३ ऑक्टोबर रोजी ...

Chimukalyan waiting for his parents | चिमुकल्यांना आईवडिलांची प्रतीक्षा

चिमुकल्यांना आईवडिलांची प्रतीक्षा

नागपूर : अशासकीय संस्थांकडील दोन चिमुकल्यांना आपल्या आईवडिलांची प्रतीक्षा आहे. वैष्णवी नावाची २० दिवसांची बालिका गतवर्षी ३ ऑक्टोबर रोजी सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळली होती. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा बालकल्याण समितीमार्फत राष्ट्रीय दत्तक शिशुगृहाकडे सोपविण्यात आले. सावनेर पोलीस या बालिकेच्या पालकांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप यश आलेले नाही.

श्रेष्ठा नामक बालिका गांधीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ जानेवारी रोजी सापडली. बालिकेला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला जिल्हा बालकल्याण समितीमार्फत वरदान दत्तक शिशुगृहाकडे काळजी व संरक्षणाकरिता सोपविण्यात आले. याही बालिकेच्या आईवडिलांचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप पालक गवसलेले नाहीत. या बालिकांबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे वा जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्याशी १० दिवसांत संपर्क साधावा, अन्यथा दत्तक प्रक्रिया केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Chimukalyan waiting for his parents