बालकलावंतांचे फूल टू धम्माल !
By Admin | Updated: June 6, 2014 00:57 IST2014-06-06T00:57:32+5:302014-06-06T00:57:32+5:30
आधीच्या ‘बॉलिवूडचे दबंग-२’ प्रमाणेच आपली दबंगगिरी दाखविण्यात बालकलावंत यशस्वी ठरले. चटकदार संवाद, ठेकेबाज नृत्य-संगीत, धडाकेबाज अँक्शन, रोमांचक थरार, भावनात्मक नाट्य हलकेफुलके विनोद

बालकलावंतांचे फूल टू धम्माल !
‘बॉलिवूडचे दबंग-३’ला उत्स्फूर्त प्रतिसाद : श्रोत्यांनी अनुभवला नृत्याचा निखळ आनंद
नागपूर : आधीच्या ‘बॉलिवूडचे दबंग-२’ प्रमाणेच आपली दबंगगिरी दाखविण्यात बालकलावंत यशस्वी ठरले. चटकदार संवाद, ठेकेबाज नृत्य-संगीत, धडाकेबाज अँक्शन, रोमांचक थरार, भावनात्मक नाट्य हलकेफुलके विनोद असे सर्वकाही या कार्यक्रमात पुरेपूर ठासून भरले होते. त्यामुळे हा कार्यक्रम फुल टू धम्माल असाच ठरला.
निमित्त होते, लोकमत बालविकास मंच व युनिक स्लीम पॉईंट प्रस्तुत ‘बॉलिवूडचे दबंग सीझन ३’ चे. सक्करदरा हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉईंट येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक मुलाने आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमात शहरातील ३0 नृत्य समूहाने भाग घेतला होता. साधारण दीडशेवर मुला-मुलींनी धमाकेदार नृत्य सादर केले. पाश्चात्य शैलीमध्ये मुलांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून सर्वांंंनाच अचंबित केले. ‘आज ब्ल्यू है पानी-पानी’, ‘लुंगी डान्स’, ‘चिकनी चमेली’, ‘चिपका ले सईयां फेविकॉल से’, ‘मेरे नाल व्हिशल बजा’ या गीतावरील नृत्याला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण टीव्ही आणि चित्रपटातील बालकलावंत जन्नत जुबैर अहमद होती.
कार्यक्रमाला प्रायोजक टेकॉप प्रा.लि.चे विलास मडावी, पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सचे आशिष जोशी, ए.जे. सुपरबाईक्सचे संचालक कपिल आवारे, नंदा पब्लिसिटीचे विजय मिसाळ, स्काय ग्रुपचे संदीप गुराटीकर, स्पार्टन डान्स ग्रुपचे कोरिओग्राफर मंत्रा मंगेश, असिस्टंट कोरिओग्राफर वसीम सय्यद, हायर इलेक्ट्रॉनिक्सचे विदर्भ हेड आशिष भिसे, सूर्या आणि पूर्वा एंटरटेनमेंटचे संचालक नंदलाल मोहाडीकर, हॉस्पिटॅलिटी पार्टनर अंगद अरोरा, ट्र साईन कॉम्प्युटर प्रा.लि.चे संचालक स्वप्नील सव्वाशेरे, जीटीपीएल न्यू चॅनलचे संचालक लकी सलूजा आणि बलराम कोहाड उपस्थित होते. संचालन नेहा राऊत यांनी केले. (प्रतिनिधी)