मिहान प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:11+5:302021-05-20T04:08:11+5:30
- एमएडीसी देताहेत शिक्षण शुल्क : २१ मेपर्यंत फॉर्म भरण्याचे आवाहन नागपूर : मिहान प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाची भावना राहू नये ...

मिहान प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या
- एमएडीसी देताहेत शिक्षण शुल्क : २१ मेपर्यंत फॉर्म भरण्याचे आवाहन
नागपूर : मिहान प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाची भावना राहू नये आणि मुलांचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) वर्ष २०१९-२० पासून प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. यावर्षी डिप्लोमा कोर्स करणाºया मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी एमएडीसीने २१ मेपर्यंत अर्ज मागविले आहेत. शिष्यवृत्ती म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च एमएडीसी उचलत आहे.
एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, मिहान प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या डिप्लोमा कोर्सचा खर्च एमएडीसीने उचलण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला. त्याला बोर्डाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुलांच्या शिक्षणात नर्सिंग, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट आदींसह अनेक डिप्लोमा कोर्सचा समावेश आहे. वर्ष २०१९-२० मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या ४० मुलांची शैक्षणिक फी एमएडीसीने परत केली आहे. याकरिता संबंधित कॉलेजकडून त्याची शहानिशा करण्यात येते. त्यानंतरच मुलांनी कॉलेजमध्ये भरलेली शैक्षणिक फी एमएडीसी परत करते. यावर्षीही प्रकल्पग्रस्तांच्या मुलांकडून २१ मेपर्यंत अर्ज मागविले असून जवळपास ४० ते ४५ मुलांचे अर्ज येण्याची अपेक्षा आहे. या अर्जाची शहानिशा करून एक आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे आम्हाला मध्येच सोडले नाही, अशी भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये राहणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना आधारे मिळेल. मिहान प्रकल्पग्रस्तांच्या भल्यासाठी एमएडीसी काम करीत असल्याचे कपूर यांनी स्पष्ट केले.