बाथरुम में बच्चे, गाव में दिंडोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST2020-12-09T04:07:49+5:302020-12-09T04:07:49+5:30
काखेत लेकरू, गावात कल्ला, या म्हणीला सार्थ करणारी ही घटना मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत घडली. वाठोड्यातील ...

बाथरुम में बच्चे, गाव में दिंडोरा
काखेत लेकरू, गावात कल्ला, या म्हणीला सार्थ करणारी ही घटना मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत घडली. वाठोड्यातील दोन लहानगी अचानक दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी अन् त्या भागातील नागरिकही त्या दोन लहानग्यांना शोधण्यासाठी धावपळ सुरू करतात. वाठोडा पोलिसांना कळविले जाते अन् पोलीसही कामी लागतात. तब्बल दोन तास शोध घेऊनही लहानग्यांचा पत्ता लागत नसल्याने पोलीसही हादरतात. अपहरणाची शंका घेऊन सर्वत्र अलर्ट दिला जातो. दरम्यान, घामाघूम होऊन बाथरूमच्या निमित्ताने कुटुंबातील एक व्यक्ती घरी परत येते. बाथरूमचे दार आतून बंद असल्याने शंका अधिक गडद होते. मुलांना आवाज दिला जातो अन् अखेर त्या व्यक्तीचा जीव भांड्यात पडतो. दोन्ही लहानगी बाथरूममध्ये सुखरूप आढळतात. ही सुखद वार्ता त्या लहानग्यांचा शोध घेण्यासाठी धावपळ करणारांना फोनो फ्रेण्ड करून कळविली जाते. सारेच्या सारे घराकडे धाव घेतात. पोलीसही पोहचतात. लहानगी बाथरूममध्ये पाणी खेळताना दार बंद करून घेतात. त्यांना वेळेचे भान असण्याचे कारण नसतेच. मात्र, ते दिसेनासे झाल्याने घरच्यांची त्या दोन तासांच्या कालावधीत जी अवस्था झालेली, ती शब्दातीत असते. दोन्ही लहानगी सुखरुप असल्याचे वृत्त कळाल्यामुळे ‘काखेत लेकरू, गावात कल्ला’ या म्हणीचा उच्चार अनेकांच्या तोंडून आपसूकच बाहेर पडतो.