शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

मुलांची विदेशात तस्करी प्रकरण : चार आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:44 IST

बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचौकशीत आढळली आक्षेपार्ह कागदपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षांत नागपुरातील ५० ते ६० मुलांना इंग्लंड (यूके) विदेशात नेऊन सोेडल्याचे स्पष्ट झाले आहे. २००७ ते २०१७ या १० वर्षांच्या कालावधीत नागपुरातून विदेशात गेलेली ५० मुले पुन्हा भारतात परतलीच नसल्याची बाब ब्रिटिश उच्चायुक्तांच्या लक्षात आल्यानंतर, सप्टेंबर २०१७ मध्ये हे प्रकरण भारतीय उच्चायुक्तांसह दिल्ली दूतावासाला कळविण्यात आले. दिल्लीतून नागपूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या गंभीर प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतून सुरू झाली. मुले विदेशात नेऊन सोडणाऱ्या आरोपींनी पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्यासाठी शाळांमधून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे ५० ते ६० मुले नागपुरातून विदेशात नेण्यात आल्याचे उघड झाले. या खळबळजनक प्रकरणाचे पुरावे मिळाल्यानंतर, सोमवारी २२ जानेवारीला गुन्हे शाखेने पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुमित तसेच तिचा पती राजेंद्रसिंग अटवाल, परमजित आणि तिचा पती रुल्डासिंग गुजर, सुरिंदर आणि तिचा पती जर्नलसिंग घोत्रा, जगविंदरसिंग आणि पियरासिंग, परमजितसिंग आणि सतवीरसिंग घोत्रा, कुलजित आणि मनजितसिंग घोत्रा, सतवंतसिंग निशांतसिंग घोत्रा, मनजित आणि काश्मीरसिंग घोत्रा, निर्मल आणि अजितसिंग, परविंदर आणि तिचा पती अजितसिंग मुलतानी तसेच जसविंदरसिंग बलबीरसिंग मुलतानी या १० दाम्पत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या सर्वांची मंगळवारी पहाटेपर्यंत चौकशी केल्यानंतर रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा या चौघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली.चौकशीदरम्यान या सर्वांच्या निवासस्थानी पोलिसांनी तपासणी केली असता, त्यांना आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली. पोलिसांनी ती जप्त केली.भारतात परतली, कुठे आहेत, माहीत नाहीविशेष म्हणजे, २००७ पासून २०१७ पर्यंत अर्थात गेली १० वर्षे हा गोरखधंदा करणाऱ्या उपरोक्त आरोपींची आलिशान निवासस्थाने आहेत. अनेक जण ट्रान्सपोर्टर म्हणून ओळखले जातात. प्रत्यक्षात ट्रान्सपोर्टच्या नावाखाली हे आरोपी आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे रॅकेट चालवीत होते. एका मुलाला इंग्लंड(यूके)मध्ये नेऊन सोडण्यासाठी ते त्याच्या पालकाकडून दोन लाख रुपये उकळत होते. इंग्लंडमध्ये बक्कळ पगाराची नोकरी मिळणार, या आशेपोटी संबंधित पालक आरोपींना रक्कम द्यायचे.दरम्यान, यासंबंधाने आज सायंकाळपर्यंतच्या चौकशीत नागपुरातून विदेशात गेलेल्या ५० ते ६० मुलांपैकी २० ते २५ मुले नागपुरात परत आली; नंतर ती कुठे गेली, हे कळायला मार्ग नाही. ती सध्या नागपुरात नाहीत. भारतातही आहेत की नाही, हे उघड झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. ते कुठे आहेत, त्याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठांचे सांगणे आहे.दलालही गजाआडया रॅकेटची महत्त्वाची कडी असलेला शिवराजसिंग राठोड नामक दलाल रात्री पोलिसांच्या हाती लागला. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती. तो उपरोक्त आरोपींना मुलांची बनावट कागदपत्रे तयार करून देत होता, असे सूत्रांचे सांगणे आहे. त्याने आतापावेतो अशाप्रकारे अनेक मुलांची बनावट कागदपत्रे तयार करून रॅकेटमधील आरोपींना सोपविल्याचीही माहिती आहे.विदेशात गेलेल्या मुलांची कोंडीबक्कळ रकमेची नोकरी मिळणार, आलिशान जीवन जगायला मिळेल, या आशेने विदेशात गेलेल्या तरुणांची तिकडे कोंडी झाली आहे. विशिष्ट कारण सांगून विशिष्ट मुदतीसाठी ब्रिटनमध्ये गेलेले हे तरुण तेथे नियोजित मुदतीपर्यंत मिळेल ते काम करीत होते. मात्र, नंतर त्यांच्या व्हीजाची मुदत संपल्यामुळे ते ब्रिटनमध्ये घुसखोर ठरले. त्यांना तेथून हाकलून लावण्याची ब्रिटन सरकारने भूमिका घेतल्यामुळे त्या तरुणांची मोठी कोंडी झाल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर