उपराजधानीत घटला बालमृत्यू दर
By Admin | Updated: May 31, 2014 01:05 IST2014-05-31T01:05:42+5:302014-05-31T01:05:42+5:30
उपराजधानीत २0११ मध्ये बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे २२ होते. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने (आयएपी) ‘फस्र्ट गोल्डन मिनिट’ अभियान हाती घेतल्याने बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे

उपराजधानीत घटला बालमृत्यू दर
प्रति हजारामागे १८ मृत्यू : ‘फस्र्ट गोल्डन मिनिट’ अभियानाचे यश
नागपूर : उपराजधानीत २0११ मध्ये बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे २२ होते. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने (आयएपी) ‘फस्र्ट गोल्डन मिनिट’ अभियान हाती घेतल्याने बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे १८ पर्यंंंंत पोहोचला आहे. अभियानाला मिळालेले हे यश देशाच्या कानाकोपर्यात पोहोचविण्याचा आयएपीचा प्रयत्न आहे, अशी माहिती आयएपीचे राज्य संयोजक व बालरोग तज्ज्ञ डॉ. आकाश बंग यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
डॉ. बंग यांनी सांगितले की, जन्मानंतर पहिला मिनिट खूप निर्णायक असतो. ज्याला गेाल्डन मिनिट म्हणतात; कारण जास्तीतजास्त बालमृत्यू याच वेळात होतात. भारतात दर मिनिटाला दोन बाळाचा मृत्यू होतो. बाळ जन्मत:च मृत्यूचे प्रमाण १0 लाख आहे. यात ३0 टक्के मृत्यू हा ‘अँस्पेक्शिया’मुळे (मूल जन्मल्यानंतर त्याला श्वास घेताना होणारा त्रास) होतो. यातून जे वाचतात ते अनेक आजारांच्या विळख्यात सापडतात. विशेष म्हणजे,‘अँस्पेक्शिया’मुळे आईच्या पोटातच मृत झालेल्या बाळाची शासनाकडे नोंद नाही. ‘अँस्पेक्शिया’ टाळण्यासाठी बाळ जन्माच्या पहिल्या मिनिटात त्याला श्वास देण्यासाठी डॉक्टरांसह परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांना याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
राज्याचे आयएपीचे कोषाध्यक्ष डॉ. बाकुल पारेख यांनी सांगितले की, जन्माच्या पहिल्या मिनिटात श्वास न घेण्याच्या स्थितीमुळे ४0 टक्के बाळांचा मृत्यू होतो. जर प्रशिक्षित व्यक्तीने बाळ श्वास घेत नसल्याचे लक्षणे ओळखून पहिल्या मिनिटाच्या अवधीत त्याला श्वास देण्यास मदत केल्यास जास्तीतजास्त मुलांना वाचविणे शक्य आहे. यामुळेच हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यात ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ने मदत केली आहे. या अभियानात २.५0 लाख डॉक्टर, पॅरामेडिकल, परिचारिका व तंत्रज्ञ यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. (प्रतिनिधी)