शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

बालमजुरी निर्मूलन दिवस; बालकामगारांचे निर्मूलन करणारे जिल्हा कृ ती दल निष्क्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 10:59 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी विशेष कृती दलाची स्थापना केली गेली आहे. पण बालकामगारांप्रति कृती दलाची भूमिका निष्क्रिय आहे.

ठळक मुद्देवर्षभरात कारवाई नाहीबालकांच्या पुनर्वसनाचे, बालकामगार मुक्तीचे जनजागरण नाही

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी विशेष कृती दलाची स्थापना केली गेली आहे. हे कृती दल बालकामगार काम करीत असलेल्या किती ठिकाणी धाड टाकतात, त्यांना रेस्क्यू करून त्यांचे पुनर्वसन करतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बालकामगार विरोधी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. पण बालकामगारांप्रति कृती दलाची भूमिका निष्क्रिय आहे.जिल्हा कृती दलाची जबाबदारी कामगार आयुक्त कार्यालयाला दिली आहे. महिला व बालविकास आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून त्यांना बालकामगार मुक्तीची चळवळ राबवायची आहे. कृती दलाला ६ ते १४ वयोगटातील कामगार बालकांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन आणि बालकांकडून काम करवून घेणाºया मालकावर, कंत्राटदारावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. तसेच बालकामगार कायदा २०१६ नुसार १४ ते १८ वयोगटातील धोकादायक ठिकाणी काम करमाºया मुलांची सुटका करून मुलांचे पुनर्वसन तसेच कामावर लावणाºया मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहे. परंतु त्यासाठी कृती दलाला धाडसत्र राबवायचे आहे. पण ही कारवाई होत नसल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने व्यवस्था निष्क्रिय असल्याचे चित्र सर्वत्र आहे.बालकांसाठी काम करणाºया ‘क्राय’ या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील २३ दशलक्ष बालकामगारांपैकी १९ दशलक्ष मुलांवर शिक्षण आणि नोकरी यांचा ताळमेळ न साधता आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. देशात लहान मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या. अपहरण झालेल्या मुलींपैकी ६० टक्के मुली १५ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत. नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी, एमआयडीसी, उमरेडच्या खाणीमध्ये वेकोलिमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड व गोंदिया जिल्ह्यातून बालकामगार कामासाठी आणले जातात. काही महिन्यांपूर्वी चाईल्ड लाईन, रेल्वे पोलीस व बालसंरक्षण कक्षाने बाहेरच्या राज्यातून कामासाठी आणलेल्या बालकांना रेस्क्यू केले होते. दोन वर्षांपूर्वी जिल्हा बालसंरक्षण विभागाने कॅण्डीको कंपनीतून मोठ्या प्रमाणात बालकांची सुटका केली होती. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन धाडसत्र राबविले जात नाही. सूत्रांच्या मते, या कारवाया शिथिल असल्याने मोठ्या प्रमाणात विविध व्यवसायात बालकामगारांचा वापर होत आहे.येथे आढळतात बालकामगारचहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल, कपडे, गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा/भंगार वेचणे, हॉटेल, बूटपॉलिश, गाड्या पुसणे, वरातीमध्ये लाईट डोक्यावर घेऊन जाणे आदी ठिकाणी बालकामगार आढळतात.

कायद्याचे उल्लंघन आहेबालकामगार निर्मूलनासाठी सरकारने कायदा केला आहे; पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बालकामगार वाढण्यात काही सामाजिक परिस्थितीही जबाबदार आहे. पण त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने नेमलेल्या प्रशासकीय यंत्रणेने कायद्याची अंमलबजावणी केल्यास बालकामगार मुक्तीची चळवळ यशस्वी होईल.- मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, एडुफास्ट वूमेन अ‍ॅण्ड चाईल्ड फाऊंडेशन

टॅग्स :Governmentसरकार