शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

नागपुरातील चिमुकल्याचा अपहरणकर्ता इंदूरमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:31 PM

तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेल्या एका गुन्हेगाराला इंदूर (मध्य प्रदेश) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून बालकाचीही सुखरूप सुटका केली.

ठळक मुद्देनेपाळला पळून जाण्याचा होता कट : पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेमुळे आरोपी सापडला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेल्या एका गुन्हेगाराला इंदूर (मध्य प्रदेश) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून बालकाचीही सुखरूप सुटका केली.फारुख ऊर्फ बम्बईया इब्राहिम खान (५५) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा नेपाळच्या विराटनगर, भूमी प्रशासन चौक, तिंगतौलिया येथील रहिवासी आहे.आरोपी फारुखने ताजबागमधील फूटपाथवर राहणाऱ्या फिरदोस फातिमा शब्बीर खान नामक महिलेच्या तीन वर्षीय चिमुकला अदनान समीर याला पतंग घेऊन देतो, असे म्हणून सोमवारी सकाळी आठ वाजता उचलून नेले. दुपार झाली तरी तो परतला नाही. त्यामुळे महिलेने आजूबाजूच्यांना ही माहिती दिली. त्यानंतर सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार सत्यवान माने यांनी आपल्या वरिष्ठांना ही माहिती कळवून आरोपींच्या शोधासाठी पथके कामी लावली. दरम्यान, आरोपी मध्य प्रदेशातील इंदूरकडे गेल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक वरिष्ठांनी इंदूरचे डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र यांना माहिती कळविली. त्यांनी इंदूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके सक्रिय करून नागपूर-इंदूर मार्गावरील वाहनांवर नजर रोखली. एका व्होल्वो बसमध्ये आरोपी फारुखला चिमुकल्या समीरसह बसून दिसताच पोलिसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेतले.सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी फारुख चिमुकल्या अदनानला घेऊन मंगळवारी सायंकाळी इंदूरहून दिल्लीला बसने जाणार होता. त्याने त्याचे तिकीटही बुक केले होते. दिल्लीहून नेपाळला पळून जाण्याचा फारूखचा कट होता. मात्र नागपूर आणि इंदूर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवल्यामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला आणि चिमुकला अदनानही सुखरूप राहिला.सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीकडून पोलिसांनी बसचे तिकीट तसेच पंधरा हजार रुपये जप्त केले.नागपूर पोलीस रवानाआरोपी फारुखला पकडल्याची आणि त्याच्या ताब्यातील चिमुकला अदनान सुखरूप असल्याची बातमी कळताच नागपूर पोलिसांचे एक पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी इंदूरकडे रवाना झाले. बुधवारी आरोपी तसेच चिमुकल्याला घेऊन हे पथक नागपुरात पोहोचणार आहे.आरोपी फारुख मूळचा नेपाळ येथील रहिवासी असून काही वर्षे तो मुंबईत होता. तर त्यानंतर ठाणे, पुणे, औरंगाबाद इथून तो नागपुरात आला. काही महिन्यांपासून तो हॉटेल कोहिनूरमध्ये काम करायचा, अशी माहिती पुढे आली आहे. छोट्या मुलांचे अपहरण करून त्यांना विकणाऱ्या टोळीचा हा सदस्य असावा, अशीही शंका आहे. त्याला अटक केल्यानंतर पुढील प्रकार तपासात स्पष्ट होईल, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणArrestअटक