तलावात बुडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST2021-03-05T04:07:37+5:302021-03-05T04:07:37+5:30

कुही : मित्रांसाेबत पाेहण्यासाठी तलावात उतरलेल्या मुलाचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव ...

Child drowns in lake | तलावात बुडून मुलाचा मृत्यू

तलावात बुडून मुलाचा मृत्यू

कुही : मित्रांसाेबत पाेहण्यासाठी तलावात उतरलेल्या मुलाचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव शिवारात बुधवारी (दि.३) उघडकीस आली.

अनमाेल गाैतम कराडे (१७, रा. रामा स्टील माँ भगवती, वर्धमाननगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. मृत अनमाेल हा साेमवारी (दि.१) सुनील शाहू, गाेलू शाहू, सतीश शाहू व प्रीतम या वर्गमित्रांसाेबत पाचगाव शिवारातील तलावात पाेहण्याकरिता आले हाेते. दरम्यान, तलावात पाेहताना अनमाेल हा खाेल पाण्यात बुडाला. हे पाहून त्याचे मित्र घाबरले व नागपूरला परत गेले शिवाय, त्यांनी ही बाब कुणालाही सांगितली नाही. दरम्यान, रात्र हाेऊनही मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याची शाेधाशाेध केली. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी लकडगंज पाेलीस ठाण्यात अनमाेलच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, बुधवारी (दि.३) कुही पाेलिसांना पाचगाव शिवारातील तलावात मृतदेह तरंगताना आढळल्याची सूचना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तपासणी केली. पाेहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तपासादरम्यान सदर मृतदेह अनमाेलचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, पाेलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना सूचना दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पाेलीस हवालदार विजय कुमरे, दिलीप लांजेवार करीत आहेत.

Web Title: Child drowns in lake