शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात दररोज एक बालक मरणाच्या वाटेवर : बंडे साने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 23:42 IST

मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.

ठळक मुद्दे१९९३ पासून १४२५५ बालकांचा मृत्यू : व्यवस्थेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.मेळघाटमध्ये गेल्या २५ वर्षात कुपोषणामुळे झालेले बालमृत्यू, उपजतमृत्यू व मातामृत्यूची समस्या गंभीर आहे. याबाबत अनेक संघटनांनी, कार्यकर्त्यांनी निवेदन दिली, मोर्चे काढले, उपोषण केली परंतु, सरकारी अनास्थेमुळे अद्यापही प्रश्न कायम आहे. अनेक मंत्री, आमदार, खासदार, वैद्यकीय अधिकारी, मोठमोठी नेते, अशा सर्वांनी मेळघाटला भेटी दिल्या व परिस्थिती जाणली. तरीही ही समस्या सुटू नये हे कोडेच असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९९३ ते २०१८ या काळात मेळाघाटात १४,२५५ बालमृत्यू झाले. उपजतमृत्यूची संख्या ३८४३ आहे तर वैद्यकीय अहवालानुसार गेल्या १८ वर्षात २२६ मातांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. एकतर सरकारकडून जाणीपूर्वक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा योजना राबविणाऱ्या प्रशासनाकडून सरकारची धूळफेक केली जात असल्याचा आरोप साने यांनी केला. कुपोषणाचे भीषण वास्तव डोळ्यासमोर असताना आवश्यक त्या सोईसुविधा भागापर्यंत न पोहचणे ही शोकांतिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मेळघाटात सोनोग्राफीची सोय नाही, एकही रक्तपेढी नाही, हव्या तेवढ्या प्रमाणात बालरोग तज्ज्ञ, प्रसुती तज्ज्ञ उपलब्ध होत नाही, भूलतज्ज्ञांचीही सेवा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा येथील नागरिकांसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत समस्या सुटेल ती कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी मेळघाटाच्या समस्यांकडे लक्ष वेधावे आणि सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला अ‍ॅड. दशरथ बावनकर, ललिता बेठेकर, अनिल राजने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Melghatमेळघाटnagpurनागपूर