ट्रकच्या चाकाखाली आल्याने मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:10 IST2021-03-10T04:10:29+5:302021-03-10T04:10:29+5:30

कुही : चालक ट्रक मागे-पुढे करीत असताना, १४ वर्षीय मुलगा त्या ट्रकच्या चाकाखाली आला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा ...

Child dies after falling under truck wheel | ट्रकच्या चाकाखाली आल्याने मुलाचा मृत्यू

ट्रकच्या चाकाखाली आल्याने मुलाचा मृत्यू

कुही : चालक ट्रक मागे-पुढे करीत असताना, १४ वर्षीय मुलगा त्या ट्रकच्या चाकाखाली आला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव शिवारात साेमवारी (दि. ८) दुपारी २ च्या सुमारास घडली. शत्रुघ्न अशोक धुर्वे (१४) असे मृताचे नाव आहे.

शत्रुघ्नचे वडील अशोक धुर्वे, रा. मलदी नहरपारा, जिल्हा बेलाेदा, छत्तीसगड हे पाचगाव शिवारातील गिट्टीच्या खाणीत काम करीत असल्याने ते याच भागात कुटुंबासह राहातात. शत्रुघ्न दुपारी या खाणीच्या परिसरात असलेल्या एमएच-४०/एके-६४९२ क्रमांकाच्या ट्रकजवळ फिरत हाेता. ट्रकचालक हा ट्रक मागे-पुढे करीत असताना शत्रुघ्न या ट्रकच्या एका चाकाखाली आला. काही कळण्याच्या आता त्याच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. घटना घडताच ट्रकचालक तिथून पळून गेला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने करीत आहेत.

Web Title: Child dies after falling under truck wheel