शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष आता नागपुरातही

By admin | Updated: January 26, 2016 03:34 IST

राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या गरीब आणि दुर्धर आजारावर उपचार करण्यास अक्षम व्यक्तींसाठी आता मुंबईनंतर

नागपूर : राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या गरीब आणि दुर्धर आजारावर उपचार करण्यास अक्षम व्यक्तींसाठी आता मुंबईनंतर राज्यात नागपूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.मुख्यमंत्री सचिवालयात यासंदर्भात मदत मिळण्यासाठी राज्यभरातून अनेक अर्ज प्राप्त होतात. तथापि, या आजाराव्यतिरिक्तही जीवितास धोका असलेले आजार तसेच अपघातातील रुग्ण असतात. मुंबई सचिवालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या धर्तीवर विदर्भातील रुग्णांना मुंबईला न जाता येथेच तत्काळ मदत मिळावी, यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.यासाठी नागपुरात वैद्यकीय साहाय्यता कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी नागपूर विभाग कार्यकारिणी समिती गठित करण्यात आली असून, या समितीमध्ये विभागीय आयुक्त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल अधिष्ठाता, उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक हे सदस्य तर डॉ. के.आर. सोनपुरे हे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सदस्य सचिव यांचा समावेश आहे.या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये दोन अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये बाबूराव ढोके, कामठी यांना वैद्यकीय साहाय्यता पुरविण्यात आली आहे. तर दुसरा अर्ज डिम्पल दीपक मोते या मूक-बधिर मुलीचा प्राप्त झाला. मात्र तो प्रलंबित ठेवण्यात आला आहे. डिम्पल मोते हिला डिसेंबर २०१५ मध्ये या समितीमार्फत वैद्यकीय साहाय्य देण्यात आले. असे असले तरीही विशेष बाब म्हणून हा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत एका व्यक्तीला तीन वर्षांत फक्त एकदाच ही मदत देता येते, अशी माहिती डॉ. के.आर. सोनपुरे यांनी दिली.(प्रतिनिधी)हैदराबाद हाऊस येथे कक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून मदत हवी असल्यास पात्र रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष नागपूर विभाग मुख्यमंत्री सचिवालय हैद्राबाद हाऊस सिव्हिल लाईन नागपूर येथे संपर्क साधावा.