पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन लोगोचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 08:27 PM2021-10-01T20:27:31+5:302021-10-01T20:30:54+5:30

Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्पाची ओळख सर्वदूर व्हावी, यासाठी या प्रकल्पाच्या वतीने घेण्यात आलेल्या लोगो स्पर्धेत अकोल्याचे गजानन घोंगडे यांचा लोगो पहिला ठरला.

The Chief Minister unveiled the new logo of the Pench Tiger Project | पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन लोगोचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन लोगोचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

googlenewsNext
ठळक मुद्देस्पर्धेतून अकोल्याचे गजानन घोंगडे यांचा लोगो ठरला पहिला ११ हजारांचा पुरस्कार मिळणार

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाची ओळख सर्वदूर व्हावी, यासाठी या प्रकल्पाच्या वतीने घेण्यात आलेल्या लोगो स्पर्धेत अकोल्याचे गजानन घोंगडे यांचा लोगो पहिला ठरला. तो वन विभागाने स्वीकारला असून त्याचे लोकार्पण वन्यजीव सप्ताहाच्या समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. (The Chief Minister unveiled the new logo of the Pench Tiger Project)

उपमुख्यमंत्री अजित पवार या समारंभाला ऑनलाईन उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) साईप्रकाश, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला अलीकडेच ग्लोबल टायगर फर्मच्या वतीने सीए-टीएस हे मानांकन मिळाले आहे. या प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय ओळख ठळकपणे व्हावी, यासाठी ही लोगोची स्पर्धा घेण्यात आली होती.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण सातत्याने विकासाच्या मागे धावतो, मात्र पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने यापुढे विचार करण्याची गरज आहे. मूलभूत गरजांसोबत हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. त्यांनी यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पाला देशातील २५ वा व्याघ्र प्रकल्प दर्जा मिळाल्यानंतर आयोजित उद्घाटन समारंभाची आठवण सांगितली. तत्कालीन केंद्रीय वन पर्यावरण मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत आपण यात सहभागी होतो, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, जंगल वाचविण्यात फॉरेस्ट गाईडची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

Web Title: The Chief Minister unveiled the new logo of the Pench Tiger Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ