मुख्यमंत्र्यांनी घेतली गडकरींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:55 IST2019-08-02T23:54:32+5:302019-08-02T23:55:41+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडकरी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाजनादेश यात्रेतील नागपूर ग्रामीणमधील सभा आटोपून आल्यानंतर त्यांनी लगेच गडकरी यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गडकरींची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडकरी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाजनादेश यात्रेतील नागपूर ग्रामीणमधील सभा आटोपून आल्यानंतर त्यांनी लगेच गडकरी यांची भेट घेतली.
गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी गडकरी यांना भोवळ आली होती. त्यानंतर गडकरी यांचे हितचिंतक चिंतित झाले होते. शुक्रवारी महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री नागपुरात होते. रात्री त्यांनी गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील होते. मुख्यमंत्री व गडकरी यांच्यात यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे राजकारणापलिकडच्या विविध गप्पांतदेखील दोघे बराच वेळ रंगले होते.