शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल अ‍ॅपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:46 IST

महाराष्ट्रातील गुन्हेगारी- २०१६ या पुस्तकाचे विमोचन आणि महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल अ‍ॅपचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस सिटीझन पोर्टल अ‍ॅपमुळे राज्याची पारदर्शितेकडे वाटचाल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१६ पुस्तकाचे प्रकाशनसामान्य नागरिक अधिक सक्षमपोलीस प्रशासन नागरिकांप्रती उत्तरदायी

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल अ‍ॅपमुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम झाले असून, पोलीस प्रशासन नागरिकांप्रती उत्तरदायी झाले आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड कुठेही बसून (आॅनलाईन) पाहता येणार आहे. आॅनलाईन तक्रार करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून महाराष्ट्राने पारदर्शितेकडे भक्कम पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.चिटणवीस सेंटर येथे आयोजित महाराष्ट्रातील गुन्हेगारी- २०१६ या पुस्तकाचे विमोचन आणि महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल अ‍ॅपचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल अ‍ॅप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच्या विशेष प्रयत्नांनी हे अ‍ॅप विकसित करण्यात यश मिळाले आहे. आता नागरिकांना आॅनलाईन तक्रार केल्यानंतर त्याचा ईलेक्ट्रानिक पुरावा त्यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही अशी सबब सांगता येणार नाही. वेगवेगळया तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पोलीस विभागाला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचा उपयोग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले.देशात सीसीटीएनएस सर्वप्रथम महाराष्ट्रातसीसीटीएनएस प्रणाली राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यामुळे गुन्ह्याचा तपास, पुरावे शोधणे व गोळा करणे, माहिती गोळा करणे तसेच साठवणे सहज शक्य होणार आहे. गुन्हा सिध्दतेचा दर राज्यात वाढला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीला शिक्षा झाली नाही तर कायद्याचा धाक गुन्हेगारांवर राहत नाही. गुन्हा सिध्दतेसाठी पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्यामुळे हा दर वाढला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१६ या पुस्तकाचे विमोचन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पुस्तकात राज्यातील गुन्ह्यांची वस्तुनिष्ठ सांख्यिकी माहिती, विवेचन, गुन्हेगारीच्या प्रवाहाचे शास्त्रोक्त विश्लेषण तसेच गुन्ह्यांचे नवीन स्वरूप आणि गुन्ह्यांमधील चढ-उतार इत्यादी माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी - २०१६ अहवालामध्ये एकूण २३ प्रकरणे असून त्यामध्ये महत्त्वाची प्रकरणे गुन्हे सर्वेक्षण, मोठ्या शहरातील गुन्हेगारी, स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे, बालकांवरील अत्याचार, आर्थिक गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे गुन्हे, बालगुन्हेगारी आदींचा समावेश आहे. यावेळी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांनी मोबाईल अ‍ॅपचे सादरीकरण केले.

 

 

 

टॅग्स :Policeपोलिस