मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांना पांघरुणात घेताहेत : उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:08 IST2025-12-12T11:06:36+5:302025-12-12T11:08:37+5:30
विधिमंडळात गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर पक्षकार्यालयात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोटी करीत ‘कोण होतास तू, काय झालास तू... भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलेस तू....’ हे विडंबनात्मक काव्य केले.

मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांना पांघरुणात घेताहेत : उद्धव ठाकरे
नागपूर : सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार दररोज पुराव्यानिशी पुढे येत आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्री पांघरुणात घेत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी सरकारमध्ये ‘पांघरूण मंत्रालय’ सुरू करावे आणि त्याचा चार्ज स्वत:कडे ठेवावा, असा टोला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
विधिमंडळात गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर पक्षकार्यालयात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोटी करीत ‘कोण होतास तू, काय झालास तू... भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलेस तू....’ हे विडंबनात्मक काव्य केले.
ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकमेकांवर धाडी टाकण्यात आल्याचे महाराष्ट्राने बघितले, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही. संघ, भाजपने मला हिंदुत्व शिकवू नये. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू ‘मी गोमांस खातो, हिंमत असेल तर मला अडवून दाखवा,’ असे खुलेआम म्हणतात. माझे हिंदुत्व काढण्याऐवजी गोमांस खाणाऱ्या मंत्र्याला बाहेर काढावे.