मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधिमंडळ अधिवेशनासाठी आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 16:14 IST2022-12-18T16:14:40+5:302022-12-18T16:14:59+5:30
महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज विमानतळावर दुपारी आगमन झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधिमंडळ अधिवेशनासाठी आगमन
नागपूर :
महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज विमानतळावर दुपारी आगमन झाले. त्यांच्यासोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही आगमन झाले .
यावेळी विमानतळावर खासदार कृपाल तुमाने,आमदार अॅड. आशिष जायस्वाल,विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी,सह पोलीस आयुक्त अश्विनी दोरजे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.