पिंपरी चिंचवड येथील प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By आनंद डेकाटे | Published: December 12, 2023 02:46 PM2023-12-12T14:46:26+5:302023-12-12T14:48:37+5:30

Nagpur News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केला.

Chief Minister Eknath Shinde announced that the investigated death of 36 animals in the Zoological Museum of Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवड येथील प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

पिंपरी चिंचवड येथील प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

- आनंद डेकाटे 
नागपूर - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केला. हे प्राणी संग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.

यासंदर्भात सदस्या अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणी संग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही.

दरम्यान, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. या प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणी संग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.

Web Title: Chief Minister Eknath Shinde announced that the investigated death of 36 animals in the Zoological Museum of Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.