शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अ‍ॅफकॉन्स, उपकंत्राटदाराविरुद्ध चिडाम कुटुंबाचीही तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:49 IST

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा; सेलू पोलीस स्टेशनकडे मागणी

मुरूमचोरीचा पर्दाफाश

नागपूर : कोटंबा येथील चिडाम कुटुंबानेही रविवारी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अधिकारी अनिल कुमार व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सचे मालक आशिष दप्तरी यांच्याविरुद्ध दीड एकर शेतातील मुरुम चोरून नेल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत शेताचे झालेले नुकसान एक कोटी गैरअर्जदारांनी भरून द्यावे व त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चिडाम कुटुंबाने केली आहे.

चिडाम कुटुंबाच्या मालकीचे सहा एकर शेत कोटंबा तहसील सेलू (जि. वर्धा) येथे आहे. त्याची सामायिक मालकी पार्वता शंकर चिडाम (६६), त्यांची दोन मुले सुभाष (४७) व सुनील (४२) आणि मुलगी रेखा चिडाम यांच्याकडे आहे. गेल्या आठवड्यात अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने यापैकी कुणाचीही परवानगी न घेता चिडाम यांच्या शेतात पोकलेन मशीन व बुलडोझर घालून दीड एकरातून मुरूम खोदून काढला व तो ट्रकद्वारे वाहून नेला.

‘लोकमत’ने ३० आॅगस्टच्या बातमीत या घटनेचा उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी (३१ आॅगस्टला) अ‍ॅफकॉन्सचे अधिकारी चिडाम यांच्या शेतात पोकलेन, बुलडोझर घेऊन पोहोचले व त्यांनी चिडाम यांच्या खड्डे पडलेल्या शेताची मुरूम भरून दुरुस्ती सुरू केली. खरे तर हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होता. पण त्यामुळे चिडाम यांच्या शेताचे अधिकच नुकसान झाले. लोकमतशी बोलताना सुनील चिडाम यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला व कुटुंबातर्फे पोलीस तक्रार सेलू पोलीस स्टेशनला रविवारी दाखल केल्याचे सांगितले. ‘शेत खोदण्यापूर्वी अ‍ॅफकॉन्स अथवा एम.पी. कन्स्ट्रक्शन्सने आमची कुणाचीही परवानगी घेतली नाही व मुरूम टाकण्यावेळीही परवानगी घेतली नाही. एका आदिवासी कुटुंबाला हा छळण्याचा प्रयत्न आहे, म्हणून पोलीस तक्रार केल्याचे सांगितले. अ‍ॅफकॉन्स आणि एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने एक कोटी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी सेलूचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर करीत आहेत. रविवारीही अ‍ॅफकॉन्सचे मुख्य अधिकारी बी. के. झा यांनी फोन उचलला नाही. या प्रकरणातून एक मोठा प्रश्न उभा झाला आहे, तो म्हणजे जर अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्स चिडाम यांचे शेत दुरुस्त करू शकते तर मग कोझी कन्स्ट्रक्शनची १०३ एकर जमीन का दुरुस्त करू शकत नाही.सरपंचांचा खोटेपणा उघडच्चोरीच्या मुरुमाची वाहतूक केल्यामुळे कोटंबा गावातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे गावात एसटी येत नाही. १ सप्टेंबरच्या वृत्तात कोटंब्याच्या सरपंच रेणुकाताई कोटंबकर यांनी एसटी सेवा बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सेलूला जाण्यासाठी आॅटोरिक्षांची व्यवस्था केल्याचे म्हटले होते.च्हे वृत्त वाचल्यानंतर कोटंब्याचे आॅटोरिक्षा चालक चंद्रभान वडगुजी भलावी (वाहन क्र. एम.एच.-३२-बी ७१४२) यांनी लोकमतला फोन करून माहिती दिली की, विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसमधूनच करावी लागते. आॅटोरिक्षातून करणे बेकायदेशीर आहे. कोटंब्यात एकूण सात आॅटोरिक्षा आहेत. त्यापैकी पाच सेलू ते वर्धा अशा चालतात व दोनच कोटंबा ते सेलू अशा चालतात.च्कोटंबा ग्रामपंचायतीने कोणतीही आॅटोरिक्षा भाड्याने घेतलेली नाही. बहुतेक विद्यार्थी शाळा बुडू नये म्हणून आॅटोरिक्षात बसतात व आम्हीही सेलूपर्यंत माणुसकी म्हणून त्यांची बेकायदा वाहतूक करतो. कधी कुणी ५-१० रुपये दिले तर घेतो; पण ग्रामपंचायत मात्र काहीच पैसे देत नाही, असे भलावी यांनी सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी