शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईन होईल मार्चपर्यंत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 1:05 AM

छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनचे १४६ किलोमीटर पैकी काम ३४ किलोमीटर पूर्ण झाली असून त्यावर रेल्वे धावत आहे. उर्वरीत ११२ किलोमीटरचे काम २०१८-१९ या वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी १ मे पासून रेल्वे रुळ येत आहेत. विद्युतीकरणाचे कामही करण्यात येत आहे. याशिवाय जबलपूर ते बल्लारशाह पर्यंत ब्रॉडगेज लाईनचे काम २०१८-१९ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नवनियुक्त ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांनी दिली.

ठळक मुद्देदपूम रेल्वेच्या नव्या ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनचे १४६ किलोमीटर पैकी काम ३४ किलोमीटर पूर्ण झाली असून त्यावर रेल्वे धावत आहे. उर्वरीत ११२ किलोमीटरचे काम २०१८-१९ या वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी १ मे पासून रेल्वे रुळ येत आहेत. विद्युतीकरणाचे कामही करण्यात येत आहे. याशिवाय जबलपूर ते बल्लारशाह पर्यंत ब्रॉडगेज लाईनचे काम २०१८-१९ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नवनियुक्त ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांनी दिली.‘डीआरएम’ पदाचा पदभार ग्रहण केल्यानंतर त्या पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. शोभना बंदोपाध्याय म्हणाल्या, जुन्या बायो टॉयलेटच्या डिझाईनमध्ये त्रुटी असल्यामुळे मल वाहून जात नव्हता. त्यामुळे टॉयलेटमध्ये दुर्गंधी पसरत होती. या समस्येला दूर करण्यासाठी आता नव्या आकाराचे बायो टॉयलेट लावण्यात येत आहेत. नागपूर विभागातील रेल्वेगाड्यात डिसेंबरपर्यंत हे बायो टॉयलेट लावण्यात येतील. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन) वाय. एच. राठोड, मुख्य अभियंता ए. के. पांडे, वरिष्ठ विभागीय अभियंता ए. के. सूर्यवंशी, नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डी. एस. तोमर, जनसंपर्क विभागाचे बीव्हीआर नायडू उपस्थित होते.सेमी हायस्पीडसाठी ४५०० कोटींचा प्रस्ताव‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांनी सांगितले की, नागपूर-बिलासपूर सेमी हायस्पीड कॉरिडोरसाठी झोन स्तरावर ४५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागात या कॉरिडोरचे आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला १३० किलोमीटर प्रतीतास वेगाने रेल्वेगाडी चालविण्यात येईल. नागपूर-सिकंदराबाद सेमी हायस्पीड कॉरिडोरचे काम मध्य रेल्वे पाहत आहे. मध्य रेल्वेच या दोन्ही कॉरीडोरसाठी समन्वयकाची भूमिका पाहत आहे.प्रवासी सुविधांवर देणार भर : श्रीवास्तवनवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, रेल्वेगाड्यात पेंट्रीकारशी निगडित समस्यांचा विभागीय स्तरावर निपटारा करणे शक्य नाही. पेंट्रीकारवर आयआरसीटीसीचे नियंत्रण असते. प्रवाशांना चांगले भोजन मिळावे यासाठी वाणिज्य कर्मचारी पेंट्रीकारवर लक्ष ठेऊन प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तत्पर राहतील.ग्रामीण भागात रेल्वेचा विकास करणारडीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी सांगितले की, त्या भारतीय रेल्वे आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. नागपूर विभाग विकासाच्या पातळीवर असून येथे नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर, डबल लाईन, थर्ड लाईन, नव्या लाईनचे काम सुरू आहे. विभागात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांचा समावेश आहे. या भागात रेल्वेचे जाळे नसल्यामुळे त्या भागांचा विकास झालेला नसून या भागात रेल्वे विकासावर भर देण्यात येईल.इतवारीवरून धावतील रेल्वेगाड्याइतवारीत पिटलाईनचे काम सुरू आहे. ही लाईन तयार झाल्यानंतर पुढील वर्षापासून इतवारीवरून थेट रेल्वेगाड्या चालविणे शक्य होईल. विद्युतीकरणासह नागपूर-नागभिड ब्रॉडगेज लाईनचा १२९३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची समस्या येत असून ती लवकरच सोडविण्यात येईल.

 

 

 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर