मराठा सेवा संघातर्फे छत्रपती शिवराय जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:12 IST2021-02-21T04:12:43+5:302021-02-21T04:12:43+5:30

नागपूर : मराठा सेवा संघाच्यावतीने सुर्वेनगर येथील संघाच्या सभागृहात छत्रपती शिवराय जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व ...

Chhatrapati Shivrai Janmotsav on behalf of Maratha Seva Sangha | मराठा सेवा संघातर्फे छत्रपती शिवराय जन्मोत्सव

मराठा सेवा संघातर्फे छत्रपती शिवराय जन्मोत्सव

नागपूर : मराठा सेवा संघाच्यावतीने सुर्वेनगर येथील संघाच्या सभागृहात छत्रपती शिवराय जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे व जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मंत्री सुनील केदार व आ. अभिजित वंजारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रदीप शेंडे यांनी वर्तमान परिस्थितीत शिवकालीन इतिहासाची प्रासंगिकता विषद केली. पुरुषोत्तम शहाणे, नरेंद्र जिचकार, यावेळी जमाते इस्लामी डॉ. अनवर सिद्धीकी, त्रिलोक हजारे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्याम डाहाके, अरुण डाहाके, जितेंद्र भोयर, सुरेंद्र उगले, आशिष हाडके, पंकज निंबाळकर, दीपक पोवळे, अशोक डाहाके, दीपक कोहळे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जिचकार, जया देशमुख, वर्षा भोयर, अनिता ठंगरे, सीमा टालाटूले, रोहिणी बळी उपस्थित होते. प्रास्ताविक दीपक खोडके यांनी केले. संचालन सीमा टालाटूले यांनी केले तर आभार श्याम डाहाके यांनी मानले.

Web Title: Chhatrapati Shivrai Janmotsav on behalf of Maratha Seva Sangha