उपराजधानीजवळ ‘छमछम’, नोटांची उधळण; तोकड्या कपड्यातील १३ मुलींसह ३७ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 05:34 IST2023-10-03T05:33:44+5:302023-10-03T05:34:08+5:30
धनाढ्यांच्या अनेक कार जप्त

उपराजधानीजवळ ‘छमछम’, नोटांची उधळण; तोकड्या कपड्यातील १३ मुलींसह ३७ अटकेत
नागपूर : नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव (ता. उमरेड) शिवारातील ‘सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्ट’मध्ये तोकड्या कपड्यात सुरू असलेल्या अश्लील डान्स पार्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री धाड टाकली. यात १३ तरुणींसह एकूण ३७ जणांना अटक करण्यात आली. या पार्टीमध्ये अनेक धनाढ्य लोकदेखील सहभागी झाले होते व विनापरवानगी दारूची विक्री सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच कार, दारूच्या साठ्यासह ४८.४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
‘सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्ट’मध्ये अश्लील डान्स पार्टी सुरू असल्याची माहिती कळताच ‘एलसीबी’च्या पाेलिस अधिकाऱ्यांनी अगोदर पाहणी केली. तेथे डान्स सुरू असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांचे पथक आत गेले. तेथे काही तरुण अश्लील नाच करत असल्याचे दिसून आले. तसेच मुलींवर पैसेदेखील उधळले जात होते. धाड टाकल्यावरदेखील गाणे सुरूच होते व अनेकांना याची कल्पना नव्हती. धाड पडल्याचे कळताच पळापळ झाली. मात्र, सर्वांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी २४ पुरुष
व १३ तरुणींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून वाहने, राेख रक्कम, विदेशी दारू व इतर साहित्य जप्त केले.