आता कोहळ्य़ापासून मिळणार ‘चेरी’!
By Admin | Updated: September 7, 2014 03:21 IST2014-09-07T01:57:53+5:302014-09-07T03:21:47+5:30
अकोला येथील कृषीविद्यापीठाचा कोहळ्य़ापासून ‘चेरी’ बनविण्याचा पथदर्शक प्रकल्प.

आता कोहळ्य़ापासून मिळणार ‘चेरी’!
राजरत्न सिरसाट/अकोला
आईस्क्रीम, श्रीखंड, बेकरी उत्पादने व इतरही काही गोड पदार्थांसह मसाला पानाचा प्रमुख घटक असलेली ह्यचेरीह्ण आता कोहळ्य़ापासून तयार करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठी एक पथदर्शक प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाला भारतीय कृषी संशोधन परिषदेने नुकतीच मान्यता दिल्याने, या तंत्रज्ञानाचे व्यावसायात रू पांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या ह्यचेरीह्ण बनविण्यासाठी कच्च्या पपईचा वापर केला जातो. आईस्क्रीम, श्रीखंड, बेकरी उत्पादने व इतर गोड पदार्थांमध्येही ह्यचेरीह्णचा वापर होतो. अर्थात ह्यचेरीह्णचा सर्वाधिक वापर पानाच्या गादीवर मिळणारे मसाला पान, तसेच पान मसाला, मुखवास इत्यादीमध्ये हो तो. पान मसाल्याची देशात मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील मागणीच्या तुलनेत चेरीचा पुरवठा कमी आहे. बाजारपेठेची गरज पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्याने, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाने, कोहळ्यापासून (काशीफळ, गंगाफळ) ह्यचेरीह्ण बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. कोहळ्य़ापासून ह्यचेरीह्ण तयार करण्यासाठी एक यंत्र तयार करण्यात आले आहे. या यंत्रात कोहळ्य़ाची साल सोलण्या पासून ते तुकडे करण्यापर्यंतची सर्व कामे होतात. एक किलो कोहळ्य़ापासून ह्यचेरीह्ण बनविण्याचा खर्च केवळ ३५ रू पये असून, बाजारात ह्यचेरीह्णला प्रति किलो ७0 रू पये दर मिळतो. हा पथदर्शक प्रकल्प चालविण्यासाठी केवळ दोन मजुरांची गरज भासते. जागाही कमी लागत असल्यामुळे घरीसुध्दा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
डॉ.पी. डी केव्हीचे संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांनी कोहळ्य़ापासून ह्यचेरीह्ण तयार करण्याचे तंत्रज्ञान व पथदर्शक प्रकल्प विकसित करण्यात आल्याचे सांगीतले. चेरीला मोठी बाजारपेठ असल्याने, शेतकर्यांसाठी हा एक चांगला जोड धंदा सिद्ध होऊ शकतो. यासाठीचे सर्व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असल्याचे लोकमतशी बोलताना सांगीतले.
** दररोज १९५0 रू पये उत्पन्न
कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्राच्या साहाय्याने एका दिवसात १00 किलो कोहळ्य़ापासून ६५ किलो ह्यचेरीह्ण तयार करता येऊ शकते. विपणन खर्च वजा करता एका दिवसात १,९५0 रू पयांचा नफा होत असल्याचे निष्कर्ष कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी काढले आहेत. या यंत्रात कोहळ्यासह पपईचीही ह्यचेरीह्ण बनविता येते.