नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:21 IST2020-06-20T20:20:13+5:302020-06-20T20:21:42+5:30
लग्नाचे आमिष दाखवून एका ३२ वर्षीय महिलेची ६ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका ३२ वर्षीय महिलेची ६ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपी रूपेश शालिकराम धुरई (३४ रा. कोकरीमाट हॉस्पिटल जवळ तकिया, भंडारा) आहे. आरोपीची पहिली पत्नी हयात असताना, त्याने मेट्रोमोनिया साईटवरून तक्रारकर्त्या महिलेशी संपर्क साधला. तिच्यासोबत खोटे बोलून लग्नाचे आमिष दाखविले. जून २०१९ पासून त्यांची ओळखी होती. दरम्यान आरोपीने तक्रारकर्त्या महिलेकडून सुरुवातीला ६ लाख व नंतर ३० हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान आरोपी लग्नास टाळाटाळ करीत असल्याने महिलेने आरोपीची अजनी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.