|
शिक्षक सह.पतसंस्था: पतसंस्था बचाव कृती समितीचा आरोप |
नागपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या आमसभेच्या नोटीसमध्ये कागदपत्रांत फेरफार करून सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप पतसंस्था बचाव कृती समितीचे अध्यक्ष विलास भोतमांगे व सचिव संजय चामट यांनी केला आहे. पतसंस्था कार्यकारिणीच्या सदस्यांना सभासदांनी निवडून दिलेले आहे. असे असतानाही संस्थेचे सरव्यवस्थापक रवींद्र बरडे व अध्यक्ष गोपाल चरडे यांनी संगनमताने इतवृत्तात खोडखाड करून विद्यमान सचिव शरद भांडारकर यांचे पदनाम गायब के ले आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार आदर्श उपविधी मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर करताना जोडण्यात आलेल्या कागदपत्रात फेरबदल करून विद्यमान सचिव पदनामासमोर ऑब्लिक चिन्हाचा वापर करून संस्थेचे सरव्यवस्थापक असा शब्दप्रयोग नमूद केल्याचा आरोप भोगमांगे व चामट यांनी केला आहे. या संदर्भात सक्करदरा पोलिसात तक्र ार दिली आहे. संचालक मंडळातून सचिव व कोषाध्यक्ष यांची पदे बाद करण्यात आली आहे. सदस्यांनी निवडून दिलेल्या सचिवांचे संपूर्ण अधिकार काढून पगारी नोकर असलेल्या सरव्यवस्थापकांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज मंजुरीच्या प्रकरणावर सचिवाऐवजी सरव्यवस्थापक व कोषाध्यक्षाऐवजी उपाध्यक्षांच्या स्वाक्षर्या घेण्यात येत आहे. नियमबाह्य निर्णय घेणार्या अध्यक्ष व सरव्यवस्थापकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी भोतमांगे व चामट यांच्यासह कृती समितीचे देवीदास काळाणे, जुगलकिशोर बोरकर, मनोज घोडके, रामदास बाभुळकर, राजेंद्र डोर्लीकर, सुनील नासरे, विष्णू बोंदरे, संजय के ने, मोहन जुमळे, शितलकुमार मेo्राम आदींनी केली आहे. (प्रतिनिधी) |