शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

कुलिंग चार्जच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक, २५ हजारांचा दंड वसूल; व्हॉट्सॲपद्वारे करा तक्रार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 30, 2024 00:37 IST

गेल्यावर्षी एका कुलिंग चार्ज वसुली प्रकरणात एका कॅन्टिन चालकावर वैधमापन शास्त्र नागपूर विभागाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

नागपूर : उन्हाळ्यात नागपुरात पॅकबंद शीतपेय आणि थंड पाणी विकताना कुलिंग चार्जेसच्या नावाखाली विक्रेत्यांचा गोरखधंदा जोरात सुरू असून ग्राहकांचे हजारो रुपयांचे दररोज खिसे कापले जात आहेत. गेल्यावर्षी एका कुलिंग चार्ज वसुली प्रकरणात एका कॅन्टिन चालकावर वैधमापन शास्त्र नागपूर विभागाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

यासंदर्भात सदर प्रतिनिधीने बाजारपेठेची पाहणी केली. विक्रेत्याला पॅकबंद एक लिटर पाण्याची बॉटल कंपनीनुसार १० ते १२.५० रुपयात मिळते. विक्रेते थंड करून २० ते २५ रुपयांना विकतात. विजेचे दर परवडत नसल्याने जास्त दरात विकतो. बिल मागितले असता, २० रुपयांचे बिल मागता काय, असे उत्तर विक्रेत्याने दिले. हीच बाब शितपेयाच्या बाबतीतही दिसून आली. ग्राहक तक्रार करीत नसल्याने विक्रेत्यांचे फावत आहे.

..तर अतिरिक्त रक्कम द्यावी लागणारकुलिंग चार्जेसह जास्त रक्कम का आकारता, असे विचारले असता, थंडी बॉटल हवी असल्यास अतिरिक्त रक्कम द्यावीच लागेल, असे स्पष्ट सांगितले. तसे पाहता शीतपेय व पाणी थंड करून विकण्याची तरतूद आहे. याकरिता कंपन्यांकडून व्यापाऱ्यांना आधीच सूट दिली जाते. त्यामुळे एमआरपीहून जास्त रक्कम विक्रेत्यांना घेता येत नाही. रेल्वे स्टेशन, बसस्टँड, रेस्टॉरंट, चहानाश्त्याची दुकाने आणि पान टपऱ्यांवर थंडच्या नावावर जास्त रकमेची वसुली सुरू आहे. नागपूर शहरात उन्हाळ्यात १ लाखाहून अधिक शीतपेयाच्या पॅकबंद बॉटल आणि तेवढ्याच एक लिटर पाण्याच्या बॉटल विकल्या जातात.

दुकानांची तपासणी मोहीमसहनियंत्रक, वैधमापन शास्त्र, नागपूर विभागाने २ ते १० मे दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली शहर आणि ग्रामीण भागातील आइस्क्रीम व शीतपेय विक्रेते आणि उत्पादकांची तपासणी मोहीम हाती घेतल्याची माहिती वैधमापन शास्त्र नागपूर विभागीय कार्यालयाचे सहनियंत्रक पांडुरंग बिरादार यांनी दिली. अहवाल १३ मे रोजी सादर होणार असून त्याआधारे ही मोहीम आणखी तीव्र होईल. याकरिता ग्राहकांनी दुकान व परिसराचे नाव टाकून विभागाच्या ९४०४९५१८२८ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे. ग्राहकाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

२५ हजार रुपये दंड वसुली !कुलिंग चार्जेच्या नावाखाली ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करणे हा गुन्हाच आहे. गेल्या उन्हाळ्यात अतिरिक्त कुलिंग चार्जेच्या प्रकरणात सुनावणीदरम्यान एका कॅन्टिन चालकावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सत्तार अब्दुल रज्जाक सय्यद असे कॅन्टिन चालकाचे नाव असून तो सावनेर, वाकी येथील द्वारका पार्कच्या कॅन्टिनचा चालक होता. पांडुरंग बिरादार, सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र, नागपूर विभागीय कार्यालय. 

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर