शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्वेदी समर्थक  येणार का देवडियात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:40 IST

चतुर्वेदींवरील कारवाईनंतर आज रविवारी शहर काँग्रेसने देवडिया काँग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत चतुर्वेदींचे कोण कोण समर्थक येतात, गटबाजी सोडून काँग्रेसला एकसंघ करण्याचा निर्धार करतात, याकडे काँग्रेसजनांसह प्रदेश काँग्रेसचेही लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देशहर काँग्रेसची ‘पडताळणी’ बैठक : प्रदेशाध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गटबाजीला लगाम घालून पक्षशिस्त पाळण्याचा संदेश देण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करीत त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. चतुर्वेदींवरील कारवाईनंतर आज रविवारी शहर काँग्रेसने देवडिया काँग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत चतुर्वेदींचे कोण कोण समर्थक येतात, गटबाजी सोडून काँग्रेसला एकसंघ करण्याचा निर्धार करतात, याकडे काँग्रेसजनांसह प्रदेश काँग्रेसचेही लक्ष लागले आहे.शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सकाळी ११ वाजता देवडिया भवनात शहर कार्यकारिणी, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला जाणार आहे. शहरातील काँग्रेसजनांना एकत्र करून पक्ष बळकट करण्यावर चर्चा केली जाणार आहे. सोबतच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना, पक्षाच्या बैठकीला पाठ दाखविणाऱ्यांना इशाराही दिला जाणार आहे.या बैठकीला शहर काँग्रेसच्या नियमित मासिक बैठकीचे स्वरूप देण्यात आले असले तरी पडद्यामागील वास्तविकता वेगळीच आहे. चतुर्वेदींवरील कारवाईनंतर त्यांचे समर्थक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक पक्षाच्या बैठकीला येतात का, की अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे चतुर्वेदी यांना पाठिंबा दर्शवितात याची पडताळणी केली जाणार आहे. चतुर्वेदींवरील कारवाईनंतरही पक्षाच्या पदावर असलेले त्यांचे समर्थक देवडियातील बैठकीला आले नाहीत व प्रदेशाध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावाला समर्थन दर्शविले नाही तर संबंधिताचाही अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Satish Chaturvediसतीश चतुर्वेदीcongressकाँग्रेस