शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरात शाळकरी मुलींचा पाठलाग करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:09 IST

शाळकरी मुलीची रस्त्याने छेड काढून त्यांना धमकी दिल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना वाडी आणि हिंगणा परिसरात घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देभररस्त्यावर विनयभंग : वाडी आणि हिंगण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळकरी मुलीची रस्त्याने छेड काढून त्यांना धमकी दिल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना वाडी आणि हिंगणा परिसरात घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.वाडीतील १५ वर्षीय मुलगी शाळा किंवा शिकवणी वर्गाला जात असताना आरोपी शुभम सुनील मानकर (वय २३) हा तिचा पाठलाग करीत होता. त्याला विरोध केला असता, तो तिला शिवीगाळ करायचा. ४ सप्टेंबरपासून त्याचा त्रास ती सहन करीत होती. २७ आॅक्टोबरला ती अशाच प्रकारे शिकवणी वर्गाला निघाली असता आरोपी तिचा पाठलाग करू लागला. तिने त्याला हटकले असता आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ केली. तिचा हात धरला. तिने विरोध केला असता मानकरने तिला मारहाण केली. या अपमानामुळे मुलगी दहशतीत आली. तिने शिकवणी वर्गाला जाणेच बंद केले. तिची अवस्था लक्षात आल्याने पालकांनी तिला विचारणा केली असता तिने आपली कैफियत सांगितली. पालकांनी तिला वाडी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मारहाण करून विनयभंग करणे, धमकी देणे आदी आरोपांसोबतच आरोपी मानकरविरुद्ध गुन्हा दाखल केला.दुसरी अशीच घटना हिंगणा परिसरातील आहे. यातील तक्रार करणारी मुलगी १३ वर्षांची असून, ती खापरीत राहते तर राम बगले नामक आरोपी मांडवा येथे राहतो. मुलीच्या मोठ्या वडिलांच्या घराचे बांधकाम सुरू असताना तो तेथे कामाला आला होता. तेथून त्यांची मुलीसोबत ओळख झाली. तिच्याकडून तिच्या आईचा मोबाईल नंबर मिळविल्यानंतर आरोपी बगले अनेक दिवसांपासून त्या मोबाईलवर मुलीसाठी मेसेज पाठवीत होता. हा प्रकार लक्षात आल्याने मुलीच्या आईने मुलीला आणि त्याला झापले. त्यानंतर २६ आॅक्टोबरला मुलगी शाळेत गेली असता त्याने तिचा पाठलाग केला. त्यावेळी या दोघांत वाद झाला. मुलीने आईला हा प्रकार सांगितला. आईने आरोपीच्या आईला फोन करून हे कळवले. यावेळी दोन्ही महिलांचा फोनवरून वाद झाला. त्यानंतर आरोपी बगले तसेच त्याच्या आईने मुलीला व तिच्या आईला अश्लील शिवीगाळ केली. त्याची तक्रार सोमवारी हिंगणा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. हवालदार गुंडर यांनी आरोपी बगले तसेच त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करून बगलेला अटक केली.मुलीला पळवून नेलेकोराडीतील एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने शनिवारी २७ आॅक्टोबरला पळवून नेले. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.

 शिकवणी वर्गासमोर तरुणीचा विनयभंग भाड्याची रुम दाखवण्याऐवजी घरमालकाने मारहाण करून अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची तक्रार एका तरुणीने (वय २१) कळमना पोलिसांकडे नोंदवली. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार , ती आणि तिची मैत्रिण सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कळमन्यातील संजय गांधीनगरातील लक्ष्मण नागपुरेच्या घरी गेली होती. ती वरच्या माळ्यावरची रूम बघत असताना आरोपी नागपुरेने तिला अश्लील शिवीगाळ करून जिन्यावरून हात पकडत खाली आणले. तिला थापड मारून तिचा विनयभंग केला. नागपुरेच्या घरी रॉयल ट्युशन क्लासेस (शिकवणी वर्ग) चालतात. यावेळी हा सर्व प्रकार अनेक विद्यार्थी बघत होते, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. कळमना पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून नागपुरेविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMolestationविनयभंग