शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

पाठलाग करीत प्रेयसीचा प्रियकराकडून भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:52 PM

कार्यालयात कामावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला प्रियकराने मोटरसायकलने धक्का दिला. ती गाडीवरून खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने सात वार केले आणि लगेच पळून गेला. घटनेच्या वेळी तिच्यासोबत दुचाकीवर तिची आईदेखील होती. परिसरातील तरुणांनी तिला लगेच कामठी येथील खासगी रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहोली येथील बसस्टॅण्डजवळ शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील साहोली बसस्थानकाजवळील थरारचाकूने केले सात वार : आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्यालयात कामावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला प्रियकराने मोटरसायकलने धक्का दिला. ती गाडीवरून खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने सात वार केले आणि लगेच पळून गेला. घटनेच्या वेळी तिच्यासोबत दुचाकीवर तिची आईदेखील होती. परिसरातील तरुणांनी तिला लगेच कामठी येथील खासगी रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहोली येथील बसस्टॅण्डजवळ शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे साहोली येथे खळबळ उडाली आहे.रत्नमाला राजकुमार ऊर्फ बाबाराव रांगणकर (२२, रा. सिंगोरी, ता. पारशिवनी) असे मृत तरुणीचे तर मंगल ऊर्फ साजन भीमराव बागडे (२४, रा. साहोली, ता. पारशिवनी) असे अटकेतील आरोपी प्रियकराचे नाव आहे. राजकुमार रांगणकर यांची सिंगोरी शिवारातील शेती वकोलि प्रशासनाने कोळसा खाणीसाठी अधिग्रहित केल्याने प्रकल्पग्रस्त कोट्यातून रत्नमालाला ती पदवीधर असल्याने वेकोलिच्या चंद्रपूर कार्यालयात सात महिन्यांपूर्वी नोकरी मिळाली होती. मात्र, तिने लगेच चनकापूर (भानेगाव-सिंगोरी) सब एरिया कार्यालयात बदली करवून घेतली होती. राजकुमार यांना तीन मुली असून, रत्नमाला ही सर्वात मोठी मुलगी होय.रत्नमाला व मंगलची आधीची ओळख असून, त्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. मंगलने तिच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. मुलीला नोकरी मिळाल्याने राजकुमार यांनी मिलन चौक, चनकापूर (ता. सावनेर) येथे जागा खरेदी करून घराचे बांधकाम सुरू केले होते. ती आईला रोज दुचाकीने मिलन चौकात सोडायची आणि नंतर कार्यालयात जायची. सायंकाळी आईला घेऊन गावाला परत जायची.मंगल ट्रकचालक म्हणून नोकरी करायचा. या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत घरच्या मंडळींना माहिती होती. मात्र, त्यांच्या लग्नाला घरच्या मंडळींचा विरोध होता. दरम्यान, ती शनिवारी सकाळी एमएच-४०/एझेड-००२५ क्रमांकाच्या दुचाकीने आईसोबत चनकापूरला जात होती. दरम्यान, मंगलने साहोली येथील बसस्टॉपजवळ तिच्या दुचाकीला मोटरसायकलने धक्का दिला. ती खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. सात वार केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याने मोटरसायकलने खापरखेड्याच्या दिशेने पळ काढला. परिसरातील तरुणांनी तिला लगेच कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान, दुपारी १२ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.छेडखानीची तक्रार२६ फेब्रुवारी रोजी मंगलने रत्नमालाला मदत केली होती. याबाबत तिच्या आईवडिलांना माहिती मिळाली होती. सायंकाळी ती आईसोबत खापरखेडा पोलीस ठाण्यात गेली आणि तिने मंगलच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. मंगल रस्त्यात छेडखानी करतो, लग्नासाठी दबाव टाकतो, असेही तक्रारीत नमूद केले होते. बदनामी होऊ नये म्हणून दोघांमध्ये आपसी समझोताही झाला होता.मंगलला मारहाणमंगल शुक्रवारी (दि. १६) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सिंगोरी येथे गेला होता. त्यावेळी त्याला गावातील मुख्य चौकात सहा तरुणांनी बेदम मारहाण केली होती. मारहाण करणारे तरुण भानेगाव, सिंगोरी व गड्डीगोदाम (नागपूर) येथील होते. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने या प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला होता; शिवाय एकाने ‘तुझी तीन लाख रुपयांत सुपारी घेतली’ असल्याची बतावणी केली होती. त्यावेळी मंगल स्वत:चा जीव वाचवून पळून गेला व त्याने ही हकीकत त्याच्या भानेगाव येथील मित्राला सांगितली. पोलिसांनी भानेगाव येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. गड्डीगोदाम येथे दोघे खुनाच्या आरोपात तुरुंगात होते. ते नुकतेच सुटून बाहेर आले आहेत.मारहाणीचा वचपाशुक्रवारी केलेल्या मारहाणीचा वचपा घेण्यासाठी मंगलने रत्नमालाचा खून करण्याची योजना आखली. तो शनिवारी सकाळपासूनच तिच्या मागावर होता. ती आईसोबत साहोली येथे पोहोचताच दुचाकीला धक्का देऊन तिला खाली पाडले आणि चाकूने तिच्या पाठीवर पाच व पोटावर दोन असे सात वार केले. दरम्यान, आईने आरडाओरड करताच परिसरातील तरुण तिच्या मदतीला धावले.घटनेची पुनरावृत्तीएकतर्फी प्रेमातून प्रिया तुळशीराम रांगणकर (१८) या शालेय विद्यार्थिनीचा खून करण्यात आल्याची घटना तीन वर्षांपूर्वी खापरखेडा येथील प्रकाशनगर कॉलनीत घडली होती. विशेष म्हणजे, प्रिया ही सिंगोरी येथील तर, तिचा मारेकरी हर्षल खुशाल गुरडकर (२०) हा साहोली येथील रहिवासी होते. ती रत्नमालाची चुलत बहीण होय. प्रियाच्या हत्येनंतर हर्षलने सोनखांब (ता. काटोल) शिवारात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. रत्नमाला व प्रिया यांनी खापरखेडा येथील शाळेत शिक्षण घेतले आहे.मोटरसायकल जप्तखून केल्यानंतर मंगल एमएच-४०/एबी-६०९८ क्रमांकाच्या मोटरसायकलने खापरखेडामार्गे धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथे पळून गेला. दिवसभर तिथे थांबल्यानंतर तो सायंकाळी पाटणसावंगी - खापामार्गे पारशिवनीला जाण्यास निघाला होता. दुसरीकडे, स्थानिक गुन्हे शाखा, पारशिवनी व खापरखेडा पोलीस त्याचा शोध घेत होते. तो पाटणसावंगी परिसरात असल्याचे कळताच स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिसांनी त्याला पाटणसावंगी - खापा मार्गावर शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास अटक करून त्याच्याकडून मोटरसायकल जप्त केली. रत्नमालाने लग्नाला दिलेला नकार आणि सहा तरुणांनी शुक्रवारी केलेली जबर मारहाण यामुळे तिचा खून केल्याने त्याने पोलिसांना सांगितले. शिवाय, त्याने मारहाण करणाऱ्या  सहाही तरुणांची नावे सांगितली.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर