शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपूरच्या  मानस चौकातील ई-तिकीट कार्यालयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मानस चौकातील रेल्वेची ई-तिकिटे विकणाऱ्या न्यू नागपूर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर धाड टाकून लाखो रुपयांची अनधिकृत रेल्वे तिकिटे जप्त केली. कारवाईदरम्यान ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी जोरदार हंगामा केला.आरोपींमध्ये बाबा फरीदनगर येथील रहिवासी मुकेश किशनलाल कुकरेजा (४६) व दिलीप किशनलाल कुकरेजा ...

ठळक मुद्देआरोपीची धक्काबुक्की : आग लावण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मानस चौकातील रेल्वेची ई-तिकिटे विकणाऱ्या न्यू नागपूर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर धाड टाकून लाखो रुपयांची अनधिकृत रेल्वे तिकिटे जप्त केली. कारवाईदरम्यान ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी जोरदार हंगामा केला.आरोपींमध्ये बाबा फरीदनगर येथील रहिवासी मुकेश किशनलाल कुकरेजा (४६) व दिलीप किशनलाल कुकरेजा यांचा समावेश आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी आरपीएफने गेल्या चार दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. त्यामुळे दलालांमध्ये खळबळ माजली आहे. आरपीएफ कमांडन्ट ज्योतिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनधिकृतपणे रेल्वे तिकिटे मिळवून ते प्रवाशांना चढ्या दरात विकत होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यात आली. दरम्यान, आरोपींनी पथकाला धमकावणे सुरू केले. कार्यालयाला लाग लावून पथकातील सदस्यांना फसविण्याची धमकी दिली. सदस्यांना बिल बुक व संगणकाची तपासणी करू दिली नाही. त्यामुळे कमांडेन्ट सतिजा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस उपायुक्त राकेश ओला यांना आरोपींच्या हंगाम्याची सूचना दिली. तपासणीमध्ये आरोपींनी मोठ्या संख्येत अनधिकृत रेल्वे तिकिटे मिळविल्याचे पुढे आले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर