शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

सीमकार्ड बदलवून उडविले ४२ लाख : सायबर गुन्हेगारांनी केले ऑनलाईन पैसे ट्रान्सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 10:20 PM

सीमकार्ड बदलवून सायबर गुन्हेगारांनी महिला व्यावसायिकाचे ४१.५० लाख रुपये उडविल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे.

ठळक मुद्देमहिला व्यावसायिकाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीमकार्ड बदलवून सायबर गुन्हेगारांनी महिला व्यावसायिकाचे ४१.५० लाख रुपये उडविल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यापासून यापूर्वी शहरातील उद्योजकांनाही फटका बसला आहे.रामदासपेठेतील रहिवासी अवंती अभिराम देशमुख अजनीच्या अजित बेकरीत संचालक आहेत. बेकरीत आणखी काही लोक संचालक आहे. अजित बेकरी आणि मेसर्स ए. आर. फूडचे धंतोलीतील सारस्वत बँकेत खाते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खात्यात अवंती आणि इतर संचालक व्यवहार करतात. या खात्यातून कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार केल्यास त्याचे मॅसेज अवंती यांना मोबाईलवर येतात. हे सीमकार्ड अवंती यांचे पती अभिराम देशमुख यांच्या नावावर आहे. सायबर गुन्हेगारांनी अभिराम देशमुख यांच्या नावाने बनावट कागदपत्र सादर करून बीएसएनएलमध्ये सीमकार्ड हरविल्याचा अर्ज केला. त्यांच्या अर्जानुसार बीएसएनएलने २८ सप्टेबरला वापरात असलेले सीमकार्ड बंद केले. त्यामुळे अवंती यांना मॅसेज येणे बंद झाले. बीएसएनएलने बनावट कागदपत्रांच्या आधारे नवे सीमकार्ड जारी केले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी अजित बेकरी आणि ए. आर. फर्मच्या खात्यातून रक्कम काढली. २८ सप्टेबरच्या दुपारी ४.३० ते ३० सप्टेबरला सकाळी १० वाजेपर्यंत दोन्ही खात्यातून वेगवेगळ्या वेळात ४१ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. ही रक्कम जाफर खान, समीर सिंह, डीजी एन्टरप्रायजेसच्या डेव्हलपमेंट, वंदना देवी यांच्या आयसीआयसीआय बँकेचे खाते आणि इंडिया फर्स्ट ट्रेडिंगच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा झाले. सीमकार्ड बंद असल्यामुळे अवंती यांना याची माहिती झाली नाही. ३० सप्टेबरला बँकेच्या कर्मचाऱ्याने अवंती यांना या व्यवहाराची माहिती दिली. त्या त्वरित बँकेत गेल्या असता त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. पैसे जमा झालेल्या फर्मसोबत काहीच संबंध नसल्याचे सांगून सीमकार्ड बंद असल्यामुळे हे घडल्याचे लक्षात आले. त्यांनी धंतोली पोलिसात गुन्हा दाखल केला. ठाणेदार विजय आकोत यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली असता बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड घेण्यातआल्याचे समजले. सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि दुसऱ्या राज्यातून हा गुन्हा घडविला असून त्यांना अभिराम देशमुख आणि बँक खात्याची माहिती कशी मिळाली हा प्रश्न आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी चौकशी न करता सीमकार्ड कसे दिले हा प्रश्न आहे. यासंदर्भात धंतोली पोलीस पुण्याला जाणार आहेत.४२ तासात केले पैसे ट्रान्सफरसायबर गुन्हेगारांनी शनिवारी दुपारी ४.३० ते सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत ४२ तासात पैसे ट्रान्सफर केले आहेत. सुटीचा दिवस असल्यामुळे ग्राहक मोबाईल कंपनीशी संपर्क साधत नाहीत. मॅसेज न आल्यामुळे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली नाही. सोमवारी बँक उघडल्यानंतर पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. पोलीस ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्या आधारे आरोपींचा तपास करीत आहेत. या प्रकारे फसवणूक झाल्याच्या यापूर्वी पाच घटना घडल्या आहेत. एका व्यापाऱ्याचे असे लाखो रुपये सारस्वत बँकेतून उडविल्यामुळे पोलिसांना बँकेतील कर्मचाऱ्यांवर संशय आहे. सायबर गुन्हेगार नेहमी वेगवेगळ्या शक्कल लढवून फसवणूक करीत असून सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांची विशेष शाखा आहे. तरीसुद्धा अशा घटना घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइनfraudधोकेबाजी