वन विभागात बदल्यांचा ‘गोलमाल’!
By Admin | Updated: August 4, 2015 03:15 IST2015-08-04T03:15:31+5:302015-08-04T03:15:31+5:30
वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा सर्रास आरोप केला जात आहे. सध्या

वन विभागात बदल्यांचा ‘गोलमाल’!
नागपूर : वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा सर्रास आरोप केला जात आहे. सध्या यावरू न सर्वत्र रान पेटले आहे. राज्य सरकारने स्वच्छ प्रशासनाच्या नावाखाली राज्यात बदली धोरण जाहीर केले आहे. परंतु या प्रकरणात राज्य सरकारने स्वत:चेच बदली धोरण धाब्यावर बसवून वन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे दिसून येत आहे. यात मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे. नागपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) शैलेश टेंभूर्णीकर यांना तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली करू न, त्यांना वनभवन येथे मुख्य वनसंरक्षक (संयुक्त वनव्यवस्थापन, नियोजन व विकास) या पदावर पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सध्या वन विभागात एकूण ११ मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) अधिकारी असून, त्यामध्ये टेंभूर्णीकर हे एकमेव मागासवर्गीय अधिकारी आहेत.
शिवाय ३ डिसेंबर १९८० च्या अध्यादेशानुसार मागासवर्गीय अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी पदस्थापना देण्याचे निर्देश आहेत. परंतु असे असताना टेंभूर्णीकर यांना तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करू न त्या अध्यादेशाचे खुलेआम उल्लंघन केले असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला आहे. ते म्हणाले, टेंभूर्णीकर यांच्या जागी आलेले गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) टी.एस.के. रेड्डी यांच्याविरुद्ध विधानसभेत कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तरीही त्यांना बक्षीसरू पात नागपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून पाठविण्यात आले आहे. यापेक्षा वनमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूर येथे त्यांना बसविले असते तर उत्तम झाले असते. यासंबंधी आपण मुख्यमंत्री व वनमंत्र्यांची भेट घेऊन या बदल्यांमध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे ते म्हणाले. सीसीएफ टेंभूर्णीकर यांनी मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात अनेक चांगली कामे केली आहेत. मात्र त्यासाठी त्यांची पाठ थोपटण्याऐवजी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या बदलीवरू न मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.