विद्यापीठाकडून पाच अभ्यासक्रमांमध्ये बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST2021-08-26T04:11:33+5:302021-08-26T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पाच विविध अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही अभ्यासक्रमात ...

विद्यापीठाकडून पाच अभ्यासक्रमांमध्ये बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पाच विविध अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही अभ्यासक्रमात अगदी लहान बदल करण्यात आले असून, काही अभ्यासक्रमात मोठे बदल आहेत. बीएस्सीच्या (रसायनशास्त्र, पर्यावरण विज्ञान) तृतीय व चतुर्थ सत्रासाठी सुधारित अभ्यासक्रम जारी करण्यात आला आहे.
बीए प्रथम वर्षातील हिंदी साहित्य व हिंदी प्रथम-द्वितीय सत्राचा सुधारित अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम टप्पेनिहाय लागू असेल. बीएस्सी (रसायनशास्त्र, पर्यावरण विज्ञान) व एमएस्सी (पर्यावरण विज्ञान) यांच्या तृतीय व चतुर्थ सत्रासाठीदेखील सुधारित अभ्यासक्रम जारी करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रमदेखील याच शैक्षणिक सत्रापासून टप्पेनिहाय लागू होईल. सोबतच बीएस्सी (प्राणिशास्त्र) व इंग्रजीच्या पहिल्या सत्रात नवीन पुस्तक लागू करण्यात आले आहे.
इतिहासातील ‘भारताचा इतिहास-१८८५ ते १९४७’ हा पेपर, बीकॉमच्या दुसऱ्या व तिसऱ्या सत्रातील ‘फायनान्शियल अकाऊंट-२’ या विषयात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. अभ्यासमंडळांच्या अहवालानंतर हे बदल जाहीर करण्यात आले.