शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणात बदल, सत्तांतराचे संकेत!

By admin | Updated: September 13, 2014 02:40 IST

पंचायत समिती सभापती व उपसभापतींची रविवारी निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व आल्याने ...

नागपूर : पंचायत समिती सभापती व उपसभापतींची रविवारी निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व आल्याने स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. घोडेबाजार वधारला असून अपक्ष व छोट्या पक्षाच्या सदस्यांना महत्त्व आले आहे.आरक्षणातील बदलामुळे काही ठिकाणी सत्ताबदल होण्याचे संकेत आहे. अधिकाधिक पंचायत समित्यावर आपलेच सभापती निवडून यावे, यासाठी राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यापैकी काँग्रेस, भाजप प्रत्येकी ३, शिवसेना ४ , राष्ट्रवादी काँग्रेस २ व एका ठिकाणी बसपाचा सभापती आहे. परंतु आरक्षणातील बदलामुळे यावेळी काही ठिकाणी सत्ताबदल होणार आहे. नागपूर पंचायत समितीची सदस्य संख्या १४ आहे. परंतु वाडीच्या दोन सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले असून एकाचा मृत्यू झाल्याने सदस्य संख्या ११ वर आली आहे. यात भाजपचे ६, काँग्रेस ४ व १ राष्ट्रवादीचा सदस्य आहे. त्यामुळे सत्तांतराची शक्यता कमी दिसते. नरखेड पं.स.मध्ये शिवसेनेचा सभापती आहे. येथील ८ सदस्यांपैकी राष्ट्रवादी ३, शिवसेना ४ व १ भाजपचा सदस्य आहे. काटोल पं.स.च्या ८ सदस्यापैकी २ पदे रिक्त आहे. ६ पैकी ४ राष्ट्रवादी तर भाजप व शेकापचा प्रत्येकी १ सदस्य आहे. कामठी येथील ८ सदस्यांत भाजप ५ तर काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. हिंगणा पंचायत समितीच्या १२ सदस्यांपैकी ८ राष्ट्रवादी तर ४ भाजपचे आहेत. क ळमेश्वरात ६ पैकी काँग्रेस ४ व भाजप २, रामटेक पं.स.च्या १० सदस्यापैकी शिवसेना ४, काँग्रेस ३ तर गोगपाचे ३ सदस्य आहे. सध्या शिवसेना व गोगपाची सत्ता आहे. मौद्यात भाजप व शिवसेना यांच्यात अटीतटीचा सामना आहे. १० पैकी भाजप ४, सेना ४ तर काँग्रेस , राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ सदस्य आहे. काँग्रेस सदस्याने सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने भाजप-सेनेत सभापतिपदासाची रस्सीखेच सुरू आहे. पारशिवनी येथे १० पैकी ४ काँग्रेस, ३ भाजप, २ सेना व १ राष्ट्रवादी असे पक्षीय बलाबल आहे.येथे सभापतिपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. उमरेड पं.स.च्या ६ सदस्यापैकी भाजप ३, काँग्रेस १ व बसपाचे २ सदस्य आहेत. सभापतिपद आधी अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यामुळे बसपाचे राजकुमार लोखंडे यांना संधी मिळाली होती. आता येथील सभापतिपद महिला (खुला) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सभापतीची निवडणूक रंगतदार होणार आहे. भिवापूर पं.स.च्या ६ सदस्यापैकी काँग्रेस २ तर भाजपचे ४ सदस्य आहेत. कुही येथील ८ सदस्यापैकी काँग्रेस ४, सेना-भाजपचे प्रत्येकी २ सदस्य आहेत. सावनेर पं.स.च्या १२ सदस्यांत भाजप ५, काँग्रेस ६ व १ अपक्ष आहे. येथे भाजपचा सभापती आहे. या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)