चंद्रशेखर मेश्राम यांचा नागरी सत्कार २८ ला

By Admin | Updated: May 25, 2017 01:50 IST2017-05-25T01:50:04+5:302017-05-25T01:50:04+5:30

वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलाजीअंतर्गत ट्रॉपिकल न्यूरोलाजी ग्रुपच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Chandrasekhar Meshram's civil hospitality will be held on 28th | चंद्रशेखर मेश्राम यांचा नागरी सत्कार २८ ला

चंद्रशेखर मेश्राम यांचा नागरी सत्कार २८ ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलाजीअंतर्गत ट्रॉपिकल न्यूरोलाजी ग्रुपच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम नागरी सत्कार समिती, इंडियन मेडिकल असोसिएशन व अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ मे रोजी डॉ. मेश्राम यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दीक्षाभूमी येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित समारोहात त्यांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, खासदार अजय संचेती, खासदार डॉ. विकास महात्मे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, समाजसेवक डॉ. विकास आमटे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे चंद्रपाल चौकसे यांनी पत्रपरिषदेत दिली. पत्रपरिषदेला एन.डी. पाटील, डॉ. राजीव खंडेलवाल, डॉ. उदय गुप्ते, डॉ. सुहास कानफाडे, मानेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Chandrasekhar Meshram's civil hospitality will be held on 28th