शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Vidhan Parishad Election : चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल; छोटू भोयर यांचा काँग्रेसप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 13:36 IST

भाजपचे नागपूर विभागातील उमेदवार व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देगडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे शक्ती प्रदर्शनजमावबंदीचे भाजप कार्यकर्त्यांकडून उल्लंघनछोटू भोयर यांचा काँग्रेसप्रवेश 

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये एन्ट्री केली. 

भाजपचे नागपूर विभागातील उमेदवार आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी गडकरी यांनी बावनकुळे यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी गडकरींच्या निवासस्थानी कांचन गडकरी यांनी बावनकुळे यांचे औक्षण केले.

आकाशवाणी चौकातून बावनकुळेंसह कार्यकर्त्यांची रॅली निघाली, यात गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे शक्ती प्रदर्शन केले. बावनकुळे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, च्या घोषणेसह अनेक कार्यकर्त्यांचा जत्था बावनकुळेंसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. महत्वाचे म्हणजे, अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी लागू केली असताना निर्बंधांना फाटा देत भाजपची रॅली निघाली. 

छोटू भोयर काँग्रेसमध्ये

भाजपचे नगरसेवक छोटू (रविंद्र) भोयर यांनी रविवारी रात्री भाजपकडे आपला राजीनामा सोपवला होता. तर, आज त्यांनी देवदिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. छोटू भोयर हे विधान परिषदेच्या नागपूर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांच नाव चर्चेत होतं. मात्र, पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला नाही. दुसरीकडे भोयर हे या दोन्ही मंत्र्यांच्या संपर्कात होते. भोयर यांना उमेदवारी दिली, तर भाजपचा नागपूर शहरातील एक मोठा गट फूटू शकतो, असा या दोन्ही मंत्र्यांचा दावा आहे. 

भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला

गेली ३४ वर्षे भाजपसोबत काम केले. तो पक्ष सोडताना मनात वेदना होत आहेत. मात्र ज्या भाजपला वाढवण्यासाठी दिवस-रात्र काम केले. अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आले आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे छोटू भोयर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूकNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक