चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:16 IST2018-01-15T20:03:01+5:302018-01-15T20:16:46+5:30

राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासनाने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

Chandrasekhar Bavankule Bhandara district's Guardian Minister | चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री

ठळक मुद्देआता नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासनाने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचे शासकीय परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जिल्ह्याला कुणीही पूर्णवेळ पालकमंत्री नव्हते. यापूर्वी बावनकुळे यांची भंडारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्याकडे आता नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Web Title: Chandrasekhar Bavankule Bhandara district's Guardian Minister