लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २९ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.उत्तर-पश्चिम अफगाणिस्तान व जवळपासच्या भागात वेस्टर्न डिस्टबेंन्समुळे तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पुन्हा एकदा उत्तर भारतातील हवामानात बदल झाला आहे. याचा थेट परिणाम मध्यभारतातही पाहायला मिळणार आहे. हवामान विभागानुसार हिमालयीन विभागात याचा परिणाम दिसून येईल. विजेच्या कडकडाटासह पाऊस व काही ठिकाणी गारपीटचीही शक्यता आहे. यानंतर ३ मार्च रोजी पुन्हा हिमालयीन विभागात वेस्टर्न डिस्टबेंस तयार होईल. यामुळे येते काही दिवस हवामानात बदल होत राहतील, हे स्पष्ट आहे. हवामान विभागानुसार अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा येथे २९ फेब्रुवारी रोजी तर १ मार्च रोजी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
नागपूरसह विदर्भात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:57 IST
नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २९ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागपूरसह विदर्भात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता
ठळक मुद्देहवामान विभागाने वर्तविला अंदाज