नवनीत राणा यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 21:10 IST2019-07-09T21:08:15+5:302019-07-09T21:10:07+5:30
खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. आनंद अडसूळ व सुनील भालेराव यांनी राणा यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत.

नवनीत राणा यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. आनंद अडसूळ व सुनील भालेराव यांनी राणा यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत.
राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता. राणा पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीवर अन्याय झाला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी राणा अपात्र होत्या. त्यांनी गैरप्रकार करून ही निवडणूक लढवली. परिणामी, त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. अडसूळ यांच्यातर्फे अॅड. सचिन थोरात तर, भालेराव यांच्यातर्फे अॅड. राघव कविमण्डन कामकाज पाहतील.