बसपा नेत्याच्या जामिनाला आव्हान

By Admin | Updated: August 22, 2015 03:00 IST2015-08-22T03:00:40+5:302015-08-22T03:00:40+5:30

अत्याचारप्रकरणातील आरोपी व बहुजन समाज पक्षाचा शहर उपाध्यक्ष राजेंद्र पडोळे याला अटकपूर्व जामीन मंजूर .....

Challenge BSP leader's bail | बसपा नेत्याच्या जामिनाला आव्हान

बसपा नेत्याच्या जामिनाला आव्हान

नागपूर : अत्याचारप्रकरणातील आरोपी व बहुजन समाज पक्षाचा शहर उपाध्यक्ष राजेंद्र पडोळे याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला पीडित महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने शुक्रवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर राज्य शासन व पडोळेला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
२० जुलै रोजी पीडित महिला एकटीच घरी असताना आरोपीने अत्याचार केला. जातीवाचक शिवीगाळ केली. त्यापूर्वी मोबाईलवर अश्लील भाषेत बोलून विनयभंग केला अशी तक्रार आहे. २७ जुलै रोजी अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४(ड) व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार कायद्याच्या कलम ३(१)(१२), ३(१)(व्ही) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
यानंतर १ आॅगस्ट रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पीडित महिलेतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Challenge BSP leader's bail