शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सभापती बोहरे भडकले - रात्रीच टाकीवर पोहोचले

By admin | Updated: July 3, 2014 00:48 IST

प्रभागात पाणी येत नाही म्हणून सामान्य नगरसेवक ओरड करीत असतानाच भाजपचे प्रतोद व लक्ष्मीनगर झोनचे सभापती असलेले गोपाल बोहरे यांनाही पाण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे.

नागपूर : प्रभागात पाणी येत नाही म्हणून सामान्य नगरसेवक ओरड करीत असतानाच भाजपचे प्रतोद व लक्ष्मीनगर झोनचे सभापती असलेले गोपाल बोहरे यांनाही पाण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे. आरपीटीएस प्रभागात सुरेंद्रनगर भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे बोहरे संतापले. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सुनावले. शेवटी रात्री ९ च्या सुमारास लक्ष्मीनगर टाकीवर पोहोचले व प्रभागात पाणी मिळाल्याशिवाय येथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत तेथेच ठाण मांडून बसले. उन्हाळ्यात शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे राजकीय नेत्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढले नाही. नगरसेवकांनी ओरड केली, पण कुणी ऐकून घेतले नाही. आता सत्ताधारी सभापतींनाही याचा फटका बसत आहे. प्रभागात पाणी न मिळाल्यामुळे संतापलेले सभापती बोहरे रात्री ९ वाजता लक्ष्मीनगर टाकीवर पोहोचले. त्यांनी ओसीडब्ल्यूच्या सर्व अधिकाऱ्यांना मोबाईल करून बोलावले. अधिकारी आल्याशिवाय आपण टाकीजवळून हटणार नाही, येथेच उपोषण करू, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. ओसीडब्ल्यूचे अभियंता गोलाईत पोहोचले. अभियंता शाहदाद यांनी तर फोनही उचलला नाही. लोकमतशी बोलताना बोहरे म्हणाले, ओसीडब्ल्यूला उन्हाळ्यात युद्धपातळीवर काम करायचे होते. मात्र दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. सुरेंद्रनगर भागात गेल्या चार दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा झालेला नाही. काही ठिकाणी जलवाहिनी फुटली असल्याचे कारण समोर करीत पाणीपुरवठा बंद केला आहे. अधिकारी फोन उचलत नाही. एकमेकांकडे टोलवाटोलवी करतात. कर्मचाऱ्यांना तर नगरसेवकांची बोलण्याची पद्धत माहीत नाही. उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची कामे उरकण्यासाठी सुट्या बंद केल्या जातात. मात्र ओसीडब्ल्यूने कर्मचाऱ्यांना सुट्या दिल्या आहेत. ओसीडब्ल्यूचा अनागोंदी कारभार सुरू असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)