केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेला नव्या कार्यकारी संचालकाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST2021-02-26T04:09:01+5:302021-02-26T04:09:01+5:30

नागपूर : येथे असलेल्या देशातील एकमेव केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेला आता नव्या कार्यकारी संचालकांची प्रतीक्षा आहे. येथील कार्यकारी संचालक ...

Central Citrus Fruit Research Institute awaits new Executive Director | केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेला नव्या कार्यकारी संचालकाची प्रतिक्षा

केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेला नव्या कार्यकारी संचालकाची प्रतिक्षा

नागपूर : येथे असलेल्या देशातील एकमेव केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेला आता नव्या कार्यकारी संचालकांची प्रतीक्षा आहे. येथील कार्यकारी संचालक डॉ. एम. एस. लदानिया यांच्या निवृत्तीमुळे हे पद आता रिक्त झाले आहे.

डाॅ. एम. एस. लदानिया मागील अनेक वर्षापासून नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. अडीच वर्षापूर्वी ते नियतवयोमानानुसार निवृत्त झाले होते. मात्र त्यांना पुन्हा अडीच वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. ती जानेवारी महिन्यात संपल्यामुळे आता हे पद रिक्त झाले आहे. सध्या तात्पुरता प्रभार नॅशनल ब्यूरो ऑफ साईल सर्व्हे ॲंड लॅंड यृूस प्लॅनचे अधिकारी डॉ. द्विवेदी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या रिक्त पदाच्या मुलाखतीसाठी देशभरातील १० व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते. त्यात नागपुरातील ५ तर अन्य ठिकाणच्या ५ व्यक्तींचा समावेश होता. ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्डाच्या पॅनलसमोर त्यांच्या मुुलाखती झाल्या आहेत. त्यातील तीन व्यक्तींची मेरिटवर निवड करून ती फाईल केंद्रीय कृषिमंत्र्यांसमोर ठेवली जाणार आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी झाल्यावर त्यांच्या आदेशानेच येथील नव्या कार्यकारी संचालकाची निवड होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदाच्या नियुक्तीसाठी सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. हे देशातील एकमेव पद असल्याने सर्व तांत्रिक बाजू तपासूनच यावर निर्णय घेतला जात आहे. येत्या आठवडाभरात किंवा त्यापूर्वीही नव्या कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीचे आदेश निघू शकतात, अशी माहिती आहे.

Web Title: Central Citrus Fruit Research Institute awaits new Executive Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.