सेंटर पॉईंटला ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:58 IST2019-08-02T22:56:35+5:302019-08-02T22:58:13+5:30

शहरातील लोकप्रिय सेंटर पॉईंट हॉटेलला यावर्षीचा ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल इन दि सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माध्यम व प्रकाशन क्षेत्रातील आघाडीच्या टुडेज ट्रॅव्हलरच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामुळे सेंटर पॉईंट हॉटेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Center Point got 'Best MICE Hotel' Award | सेंटर पॉईंटला ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल’ पुरस्कार

सेंटर पॉईंटला ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल’ पुरस्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरातील लोकप्रिय सेंटर पॉईंट हॉटेलला यावर्षीचा ‘बेस्ट एमआयसीई हॉटेल इन दि सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माध्यम व प्रकाशन क्षेत्रातील आघाडीच्या टुडेज ट्रॅव्हलरच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामुळे सेंटर पॉईंट हॉटेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नवी दिल्लीमधील हॉटेल ताज पॅलेस येथे पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. केंद्रीय पर्यटन व सांस्कृ तिक राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल व जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सेंटर पॉईंट हॉटेलला पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक जसबीरसिंग अरोरा यांनी पुरस्काराबाबत मनोगत व्यक्त केले. या पुरस्कारामुळे भारावून गेलो आहोत. हा पुरस्कार उत्कृष्टतेची पावती आहे. सेंटर पॉईंट हॉटेलला रात्रभरात हे यश मिळाले नाही. त्यासाठी गेली ३० वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागले. प्रत्येक दिवशी नवीन आव्हाने असतात. त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी दूरदृष्टीने कृती करावी लागते असे अरोरा यांनी सांगितले.
सेंटर पॉईंट हॉटेल गेल्या ३० वर्षापासून ग्राहकांना दर्जेदार सेवा देत आहे. नागपूरमध्ये आल्यानंतर या हॉटेलमध्ये थांबण्यास पहिली पसंती दिली जाते. या हॉटेलमध्ये दरवर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र, लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम यासह विविध मेगा इव्हेंट आयोजित केले जातात. अंगद व अर्जुन अरोरा यांच्यासह सुमित कांत, शेफ मनीष सरना, तारा प्रकाश, सौमित रॉय, आय. ए. खान, आशिष कांबळे व नितीन जोशी यांचे हॉटेलच्या यशात महत्त्वाचे योगदान आहे असेही अरोरा यांनी सांगितले.

Web Title: Center Point got 'Best MICE Hotel' Award