राज्यात १ मे पासून जनगणनेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:55 AM2020-02-17T10:55:00+5:302020-02-17T10:55:18+5:30

राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

The census starts from May 1 in the state | राज्यात १ मे पासून जनगणनेला सुरूवात

राज्यात १ मे पासून जनगणनेला सुरूवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात १ मे पासून जनगणनेचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जनगणनेसोबत एनपीआर होण्याबाबत संभ्रम असून ओबीसींच्या जनगणनेबाबतच संभ्रम कायम आहे.
प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ मध्ये जनगणना जाहीर करण्यात आली होती. आता २०२१ मध्ये जनगणना जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात नागरिकांच्या घरातील संपूर्ण माहितीसह धर्माचीही तसेच अनुसूचित जाती व जमातीची नोंद करण्यात येते. यंदा जनगणनेसोबत एनपीआर करण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. एनआरसीचा पहिला टप्पा एनपीआर असल्याचे सांगत याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, याबाबत अद्याप केंद्र शासनाकडून कोणत्याची स्पष्ट सूचना प्रशासनाला नाही. दरम्यान, जनगणनेसंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: The census starts from May 1 in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार