संस्कृत सखी सभेचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:07 IST2021-02-27T04:07:52+5:302021-02-27T04:07:52+5:30
नागपूर : संस्कृत सखी सभा या अतिशय नावाजलेल्या व्हॉट्सअॅप समूहाचा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी आचार्य ...

संस्कृत सखी सभेचा वर्धापन दिन साजरा
नागपूर : संस्कृत सखी सभा या अतिशय नावाजलेल्या व्हॉट्सअॅप समूहाचा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त डॉ. प्रिया पेंढारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराज्याभिषेक नाटकातील एका अंकाचे अभिवाचन डॉ. प्रगती वाघमारे, डॉ. प्रिया पेंढारकर, नीलिमा पुराणकर आणि श्रद्धा कोटस्थाने यांनी साभिनय सादर केले. सूर्याष्टक आणि नर्मदाष्टकचे गायन अनुपमा गुरू आणि इतर सख्यांनी मिळून केले. कुंदा पागे यांनी लघु निबंधाचे वाचन केले. डॉ. सुनीती जोशी यांच्या ‘अर्वाचीन संस्कृत साहित्यातील सुभाषिते’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजया जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले. डॉ. शारदा गाडगे यांचा सत्कार केला. संस्कृत सखी सभेचा वार्षिक अहवाल तसेच आगामी कार्यक्रमांची माहिती सोनाली अडावदकर यांनी दिली. संचालन डॉ. स्मिता होटे आणि संस्कृती होटे भेलोंडे यांनी केले.
0-0-0-0-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे मनपा वाचनालय बंद
()
नागपूर : तब्बल पाच महिन्यांच्या अवकाशानंतर नागपूर शहरात पुन्हा एकदा एक हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळल्याने धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगर पालिकेचे सर्व वाचनालय आणि अभ्यासिका ७ मार्च २०२१पर्यंत पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. मनपाचे अशोकनगर येथील डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय हे नागपूर शहरातील २४ तास सुरू असणारे प्रतिष्ठित वाचनालय आहे. वाचनालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करतात. सध्या आरोग्य व इतर विभागाच्या परीक्षा आहे. वाचनालय बंदचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता वाचनालय बंद हे विद्यार्थांच्या आरोग्य हिताचे असून, नागरिकांच्या सुरक्षेकरिता योग्य आहे. त्यामुळे विद्यार्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाचनालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी सुबोध चहांदे यांनी केले आहे.