प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:00+5:302021-02-05T04:55:00+5:30

नागपूर महानगरपालिका () नागपूर महानगरपालिकेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी ध्वजारोहण केले. महापौर आणि महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अग्निशमन ...

Celebrate Republic Day with enthusiasm | प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

नागपूर महानगरपालिका ()

नागपूर महानगरपालिकेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी ध्वजारोहण केले. महापौर आणि महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अग्निशमन विभागाच्या परेडची पाहणी केली. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, सतरंजीपुरा झोनचे सभापती अभिरुची राजगिरे, नगरसेवक सुनील अग्रवाल, जितेंद्र घोडेस्वार, मोहम्मद इब्राहिम, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, राजेश भगत, मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, अमोल चोरपगार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, श्वेता बॅनजी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके उपस्थित होते.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आयुक्त तथा नासुप्र सभापती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर आयुक्त हेमंत पवार, मुख्य अभियंता सुनिल गुज्जेलवार, महाव्यवस्थापक व नगर रचना विभागाचे उपसंचालक लांडे, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी पोहेकर, आस्थापना अधिकारी योगिराज अवधूत, सचिव कल्पना गीते उपस्थित होते.

किनखेडे ले-आऊट

बिनाकी किनखेडे ले-आऊट येथे माजी महापौर किशोर डोरले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमोद बारई, दिलीप बारापात्रे, धनराज धकाते, अनिल राईकवार, अशोक बारापात्रे, मारुती निमजे, शंकर गायधने, श्याम घाटे, मोहन बरमार, नारायण कोसे, मदन गुरव, पोदुत पात्रा, हेमंत पाटील उपस्थित होते.

मेट्रो भवन ()

मेट्रो भवन येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महा मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बार्टी समतादूत प्रकल्प ()

प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीअंतर्गत पुणे समतादूत प्रकल्पातर्फे ध्वजारोहण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मदर टेरेसा प्रायमरी स्कूल शंभूनगर मानकापूर येथे तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. समतादूत मंजुषा मडके यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक सातपुते, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल ()

प्रजासत्ताकदिन कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल, हरदास विद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

..........

Web Title: Celebrate Republic Day with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.