शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

सण, उत्सव घरीच साजरे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरामध्ये अनिश्चितेचे सावट आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कर्ता पुरुष हिरावून घेतल्याने अनेक कुटुंबे ...

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरामध्ये अनिश्चितेचे सावट आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कर्ता पुरुष हिरावून घेतल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. यामुळे मोठ्या प्रयत्नांनी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, पुन्हा तीच स्थिती निर्माण होऊ नये, याची प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे, या वर्षी तरी सार्वजनिक स्तरावरील धार्मिक श्रद्धा आणि सण, उत्सवांमधील बदल स्वीकारणे महत्त्वाचे आहे. हा संयम बाळगल्यास स्थिती पुन्हा पूर्वपदावर येऊन त्यानंतरचे सणवार उत्साहात, आनंदात आणि आपल्या लोकांमध्ये साजरे करता येईल. नाहीतर एक चूक संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ठरेल, असे मत नागपुरातील प्रसिद्ध डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

- कोरोना संपलेला नाही, यामुळे अतिउत्साह नको - डॉ. दंदे ()

दंदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे म्हणाले, कोरोना संपलेला नाही, त्याचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे सण-उत्सवाच्या या दिवसात अतिउत्साह दाखवू नये. घरीच सण साजरे करावे. निर्बंध शिथिल झाले असले तरी स्वत:वर निर्बंध घालावे. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला दूर ठेवण्यासाठी कोरोनाची त्रिसूत्री म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व वारंवार हात धुणे पाळायलाच हवे. सोबतच ज्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले नाही, त्यांनी धोक्याचा इशारा समजून घ्यायला हवा.

- संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी घरीच राहा - डॉ. मरार ()

ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी सार्वजनिक वावर करताना ठेवायचे अंतर (सोशल डिस्टन्सिंग) हे महत्त्वाचे उपाय ठरले आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी या निर्बंधाचे पालन होत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. दुसरीकडे सलग १७ महिने शासनासह, डॉक्टरांसह, रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. परंतु तेही आता थकलेले आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आता परवडणारी नाही. यामुळे घरीच सण, उत्सव साजरे करायला हवे.

कठोर निर्बंध नको असेल तर घरीच थांबा - डॉ. संचेती ()

न्यू ईरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती म्हणाले, कोरोना विषाणूचा नवनवीन व्हेरियंट समोर येत आहे. पाश्चात्त्य देशात त्याचे धोकेही दिसून येत आहेत. यामुळे आता ही वेळ गाफील राहण्याची नाही. उत्परिवर्तन हे विषाणूचे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि त्यासाठी संसर्ग पसरणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. यासाठी सार्वजनिक स्तरावर सण,उत्सव साजरे न करताच ते घरी साजरे केल्यास याला काही प्रमाणात आळा बसेल.

- कोरोनाचा धोका कायम आहे - डॉ. अरबट ()

क्रिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अरबट म्हणाले, तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व वारंवार हात धुणे, हे कोरोनाचे नियम आहेत. परंतु सार्वजनिक सण, उत्सवात हे नियम पाळले जातीलच, असे नाही. यामुळे कोरोनाच्या एका रुग्णाकडून २५ ते ३० जणांना लागण होते, हे लक्षात घ्यायला हवे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी वाढलेले व्हायरल व डेंग्यूचे रुग्ण, वातावरणातील बदल यामुळे धोका कायम आहे.

- कोरोनाला नाहक आमंत्रण देऊ नका - डॉ. काळबांडे ()

विम्स हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विनायक काळबांडे म्हणाले, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आपल्याकडे प्रत्येकाचे संपूर्ण लसीकरण झालेले नाही. कोरोनाची दुसरी लाट कमी होताच कोरोनाचे प्रतिबंधक नियमही पाळणे कमी झाले आहे. यात आता सण, उत्सव जवळ आले आहेत. गर्दी वाढून पुन्हा कोरोनाला नाहक आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. स्वत:ला व इतरांना धोक्यात आणण्यापेक्षा सण, उत्सव घरीच साजरे करायला हवे.