शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नवकार मंत्राचा जप करून जन्म कल्याणक महोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 06:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही धार्मिक उत्सवाचे आयोजन न करता श्रद्धाळूंनी आपापल्या घरी नवकार मंत्राचा जप आणि सामयिक अनुष्ठान करून भगवंताचे अभिवादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही धार्मिक उत्सवाचे आयोजन न करता श्रद्धाळूंनी आपापल्या घरी नवकार मंत्राचा जप आणि सामयिक अनुष्ठान करून भगवंताचे अभिवादन करण्यात आले. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती, पश्चिम नागपूरतर्फे भाविकांना घरोघरी नवकार मंत्राचे जप करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जैन समाजाच्या अनुयायांनी त्यांच्या घरीच भगवान महावीर यांची आराधना केली. समितीचे संयोजक पवन खाबिया यांनी सांगितले, दरवर्षी भगवंताच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त समितीच्या वतीने रक्तदान शिबिर, भोजनदान, अहिंसा स्कूटर रॅली, भक्तिसंध्या तसेच आबालवृद्धांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र जगभरासह आपल्या देशातही कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे असल्याने समितीने जन्म कल्याणकाचे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. भाविकांना आपल्या घरीच सकाळी ९ ते १० वाजता नवकार मंत्राचा जप करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे खाबिया यांनी सांगितले. यात श्वेतांबर जैन समाज पश्चिम नागपूर, सुमतीनाथ महिला मंडळ, अरिहंत मंडळ, पश्चिम नागपूर महिला मंडळ, शासन सेविका मंडळ, जैन सूर सरगम मंडळ, जैन सहेली मंडळ, अरिहंत टच, महावीर इंटरनॅशनल, जैन-१५, जीटो नागपूर, बीजेएस नागपूर सेंट्रल, गुरुभक्त सेवा समिती व इतर संस्थांचे सहकार्य होते. कोर कमिटीचे कांतिलाल झामड, निखिल कुसुमगर, विक्रम शाह, राजेंद्र लोढा, प्रफुल्ल जैन, उमेश भंसाली, आनंद ओस्तावाल, महादेव सिंघी, मानक चंद सेठिया, पीयूष फतेहपुरिया आदींची महत्त्वाची भमिका आहे.

टॅग्स :Mahavir Jayantiमहावीर जयंती