शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

निधी अभावी दहा महिन्यांपासून सीसीटीव्ही प्रकल्प प्रतीक्षेत; नागपूर जिल्ह्यातील ४५० शाळांचा प्रस्ताव अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:26 IST

Nagpur : ४५० जि. प. शाळांचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पुण्याला अडकलेला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालघर-ठाणे जिल्ह्यातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला, निधीअभावी व प्रशासकीय प्रक्रियेमुळे नागपूर जिल्ह्यातील जि. प.च्या ४५० शाळांचा प्रस्ताव गेल्या दहा महिन्यांपासून पुणे कार्यालयात मान्यतेसाठी अडकल्याची माहिती आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंताया कॅमेरांमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, शिस्तबद्धता, मालमत्तेचे संरक्षण आणि गैरप्रकारांवर नियंत्रण हे उद्दिष्ट होते. पण, प्रकल्प रखडल्याने या उद्दिष्टांवर पाणी फिरले आहे. पालक वर्गातूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

१५१२ पैकी ४५० शाळांनाच सीसीटीव्हीजिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे, अशा ४५० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा खर्च मंजूर झाला असून, जिल्हा नियोजन निधीतून तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होत आहे. जि. प.च्या १५१२ शाळांपैकी ४५० शाळांतच हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

मुख्य मुद्दे

  • ४५० शाळांसाठी सीसीटीव्ही प्रस्ताव १० महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत
  • ४ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद असूनही अंमलबजावणीला विलंब
  • चोरी व अनुशासनाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रकल्प गरजेचा
  • पालक आणि शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता

चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष

  • २७ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे, आणि त्याआधीच काही शाळांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत.
  • ११ ते १६ मे दरम्यान काटोल शहरातील जिल्हा परिषद शाळेतील संगणक, वायरिंग, टेबल, टीव्ही इत्यादी साहित्य चोरीला गेले.
  • यानंतर संबंधित ३ मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करून सीसीटीव्हीची मागणी केली होती.
टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाnagpurनागपूरzp schoolजिल्हा परिषद शाळा